गौरीशंकर फार्मसी लिंब महाविद्यालय तर्फे लोणंद वारीतील भाविकांना मोफत औषध वाटप
लिंब – शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालय दरवर्षी लोणंद येथे जाऊन राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी मोफत औषध वाटप केले जाते यावर्षीही महाविद्यालयाने ही परंपरा कायम ठेवत वारकरी भाविकांना वेदनाशामक ताप पित्त मळमळ शारीरिक दुखापतीसाठी बँडेज तसेच शारीरिक व्याधीवर नामवंत कंपनीचे औषध मोफत वाटप करण्यात आली सामाजिक भावनेतून महाविद्यालयाने केलेल्या कार्याची भाविक वारकरी मंडळी तसेच शासकीय अधिकारी व प्रशासनाने कौतुक केले आहे.
भाविकांना मेडिकल कॅम्पद्वारे मोफत औषधा बरोबरच वारीमध्ये आरोग्य विषयाबाबत घ्यावयाची काळजी बाबत प्रबोधन ही करण्यात आले या कामी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. योगेश गुरव ,प्रा. स्वप्नाली झोरे, प्रा. शुभम चव्हाण, प्रा. दुधेश्वर क्षीरसागर, प्रबंधक निलेश पाटील, युवराज जाधव, संजय देशमाने विद्यार्थी प्रतिनिधी सहभागी झाले होते.
या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप उपाध्यक्ष मिलिंद जगताप, संचालक डॉ.अनिरुद्ध जगताप, जयवंतराव साळुंखे, आप्पा राजगे, प्रशासकीय अधिकारी नितिन मुङलगीकर जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी कौतुक केले .
