Home » देश » धार्मिक » लोक जातीयवादी नसतात, तर नेते स्वतःच्या स्वार्थासाठी जातीयवादी असतात-मंत्री नितीन गडकरी

लोक जातीयवादी नसतात, तर नेते स्वतःच्या स्वार्थासाठी जातीयवादी असतात-मंत्री नितीन गडकरी

लोक जातीयवादी नसतात, तर नेते स्वतःच्या स्वार्थासाठी जातीयवादी असतात-मंत्री नितीन गडकरी

आजकाल मागासलेपणा हा राजकीय स्वार्थ बनत चालला आहे. कोण जास्त मागास आहे याची सध्या स्पर्धाच सुरु आहे. पण माझा अनुभव असा आहे की, लोक जातीयवादी नसतात, तर नेते स्वतःच्या स्वार्थासाठी जातीयवादी असतात, असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

नागपूर येथे झालेल्या सेंट्रल इंडिया ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या दीक्षांत समारंभाला गडकरी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी जातीयवादाचे विष फेकून देण्याच्या दृष्टीने काही विधाने केली. सामाजिक विषमता दूर करण्याची गरज असून जातीभेद संपला पाहिजे आणि ही प्रक्रिया स्वतःपासून सुरू झाली पाहिजे असे सांगून गडकरी पुढे म्हणाले की, समाजाच्या सर्वांगिण आणि एकजिनसी विकासासाठी जितक्या लवकर जाती संपतील, तितके उत्तम. एखाद्या व्यक्तीचे मूल्य जात, धर्म, भाषा किंवा लिंग यावरून नव्हे तर त्याच्या गुणांवरून ठरवले पाहिजे.

माणूस त्याच्या जाती, पंथ, धर्म, भाषा किंवा लिंगावरून ओळखला जात नाही, तर त्याच्या गुणांवरून ओळखला जातो. म्हणून आम्ही जात, पंथ, धर्म, भाषा किंवा लिंगाच्या आधारावर कोणाशीही भेदभाव करणार नाही. मी राजकारणात आहे आणि इथेही जातीयवाद चालू आहे. पण मी माझ्या पद्धतीने काम करतो. यापूर्वी गडकरी जातीभेदाबद्दल म्हणाले होते की, मी जातीच्या आधारावर भेदभाव करत नाही. मला पुन्हा मते मिळोत की नाही. पण अनेकदा लोक जातीच्या आधारावर मला भेटायला येतात. मी त्या ५०,००० लोकांना सांगितले की, जो कोणी जातीबद्दल बोलेल, मी त्याला जोरदार लाथ मारीन. मी सार्वजनिक ठिकाणी धर्म आणि जातीबद्दल बोलत नाही. मी निवडणूक हरलो किंवा माझे मंत्रीपद गमावले तरी मी या तत्वावर ठाम राहीन.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते २७ एप्रिल दरम्यान चालेल

Post Views: 74 नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते

Live Cricket