पहिले उपमुख्यमंत्री अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा, आ.राहुल कुल यांच्यासमोर भाजप उपाध्यक्षांची खदखद
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढा, जर अजित पवार हे सत्तेत असतील तर आम्हाला सत्ता देखील नको. पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार आमच्या बोकांडी बसवले आहे, असे म्हणत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यासमोर पुणे जिल्हा उपाध्यक्ष आणि पुणे बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील आढावा बैठकीमध्ये आपली खदखद बोलून दाखवली आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.