वसंतगड येथे कृषीकन्यांनी दिली शास्त्रीय पद्धतीने भाजीपाला लागवडीची माहिती.
कराड तालुक्यातील वसंतगड गावामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी सलग्न कृषी महाविद्यालय कराडच्या कृषी कन्यांनी ग्रामीण जागरूकता कार्यक्रमांतर्गत, सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला लागवड करण्यासंदर्भात व त्यासाठी वापरली जाणारी सेंद्रिय खते याबद्दल माहिती दिली. वसंतगड मधील शेतकरी श्री. रघुनाथ नलवडे यांच्या शेतामध्ये कृषीकन्यांनी लागवडी संदर्भात प्रात्यक्षिक करून दाखवले. त्यामध्ये त्यांनी विविध प्रकारच्या भाजीपाला लागवडीसाठी वापरली जाणारी पिकांमधील अंतरे व बियाणांवरती केली जाणारी प्रक्रिया तसेच पिकांच्या जोपासणी व उत्पादन वाढीसाठी लागणारी सेंद्रिय खते देणारे जिवाणू जसे की रायझोबियम, फॉस्फेट सोल्युबलाइजिंग बॅक्टेरिया, ट्रायकोडरमा इ. बद्दल माहिती दिली. या सगळ्यामुळे जमिनीला व पिकाला मिळणारे फायदे शेतकऱ्यांना समजावून सांगितले. या प्रात्यक्षिके दरम्यान कृषीकन्यांनी पालक, भेंडी, कोथिंबीर, गवार, बीट इत्यादी. पिकांची लागवड केली. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी पाटील, कार्यक्रम समन्वयक डॉ. राजेंद्र हसुरे, कार्यक्रम अधिकारी डॉ.सुनील आडांगळे व डॉ.अर्चना ताठे, केंद्रप्रमुख डॉ.राणी निंबाळकर व फलोत्पादन विषय तज्ञ डॉ. कीर्ती भांगरे, डॉ. संतोष मरबळ. व डॉ. अमृता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी कन्या कु.रिद्धी खैरे, कु.आर्या कुलकर्णी, कु.वैष्णवी बाबर, कु.त्रिवेणी कोमरा, कु.स्नेहल लोंढे, कु.श्रेया पाटील यांनी हा उपक्रम राबविला.