Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » फार्मर कप स्पर्धेत आसनगावच्या शेतकरी गटांचा डंका

फार्मर कप स्पर्धेत आसनगावच्या शेतकरी गटांचा डंका

फार्मर कप स्पर्धेत आसनगावच्या शेतकरी गटांचा डंका

पिंपोडे बुद्रुक- आसनगाव (ता. कोरेगाव) येथील कृषीलक्ष्मी महिला शेतकरी गटाने पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप स्पर्धेत गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही सातत्य राखत उल्लेखनीय कामगिरी केली. राज्यभरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरणाऱ्या या गटाला प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. विशेष म्हणजे आसनगावमधील धनलक्ष्मी या शेतकरी गटानेही कोरेगाव तालुक्यात दुसरा क्रमांकाचे २५ हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले आहे. 

कोरेगाव तालुक्यातील उत्तर भाग हा दुष्काळ म्हणून ओळखला जातो. या परिसरातील अनेक गावांमध्ये मागील काही वर्षांपासून लोकसहभागातून जलसंधारणाची कामे होत आहे. त्याचबरोबर शाश्वत शेतीच्या दिशेने पाऊल टाकण्याच्या दृष्टीने गट शेतीचा अवलंब केला आहे. त्यापैकी एक गाव असलेल्या आसनगावमधील कृषीलक्ष्मी शेतकरी गटाने गतवर्षी पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप स्पर्धेमध्ये केलेल्या कामामुळे त्यांचा राज्यातील सर्वोत्कृष्ट शेतकरी गट म्हणून गौरव करण्यात आला होता. त्याचप्रमाणे यंदाही या शेतकरी गटाने सातत्य राखले. त्याचबरोबर दुसरा धनलक्ष्मी शेतकरी गट स्थापन केला. या दोन्ही गटाच्या माध्यमातून गावात महिलांनी सामूहिक शेती करून आधुनिक, शास्त्रशुद्ध व सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. 

यंदा फाउंडेशनच्या फार्मर कप स्पर्धेत धनलक्ष्मी गटाने पहिल्याच वर्षी कोरेगाव तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला, तर कृषीलक्ष्मी या गटाने राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत राज्यातून चार हजार ३६० शेतकरी गटांनी सहभाग घेतला. पहिल्या टप्प्यात विविध तांत्रिक व मौखिक परीक्षांच्या माध्यमातून राज्यातील ३०० शेतकरी गटांची, तर अंतिम टप्प्यात राज्यस्तरीय परीक्षांसाठी सर्वोत्तम २५ शेतकरी गटांची निवड करण्यात आली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण नुकतेच पुणे येथे पार पडले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, अभिनेते आमीर खान, किरण राव, सत्यजित भटकळ, डॉ. अविनाश पोळ, पोपटराव पवार, सह्याद्री ॲग्रोचे विलास शिंदे आदी उपस्थित होते. 

यामध्ये कृषी लक्ष्मी शेतकरी गटाचाही समावेश होता. निवड झालेल्या गटांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली, तसेच धनलक्ष्मी शेतकरी गटालाही तालुकास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket