प्रसिद्ध कलाशिक्षक चंद्रकांत ढाणे यांचेकडून वाई कन्याशाळेस रु. ५० हजारांचा देणगी
भुईंज :- महेंद्रआबा जाधवराव महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेच्या वाई कन्याशाळेचा सध्या ‘शताब्दी’ महोत्सव चालू आहे. त्या निमित्ताने शाळेत देणगीदारांचा कृतज्ञता मेळावा नुकताच संपन्न झाला. याच शाळेत कलाशिक्षक म्हणून प्रसिध्द असलेले आणि संस्थेच्या पुणे येथील ‘विद्यापीठ हायस्कूल चे सेवानिवृत्त मुख्याध्यापक चंद्रकांत ढाणे व सुरेखा ढाणे यांनी ५८ हजार रुपयांचा धनादेश संस्थेचे संचालक व शालेय समितीचे अध्यक्ष ऍडव्होकेट प्रभाकर सोनपाटकी यांच्याकडे सुपूर्द केला.
ही देणगी चंद्रकांत ढाणे यांचे वडील स्व. आबासाहेब ढाणे यांच्या स्मरणार्थ शाळेतील गरीब- गरजू विद्यार्थिनींसाठी दिली. यावेळी संस्थेचे उपसचिव प्रदीप वाझे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या योगदानाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका रुक्मिणी भोये, ऍड सोनपाटकी यांनी श्री. ढाणे यांचे बद्दल गौरवोदगार काढले. ते म्हणाले, चंद्रकांत ढाणे हे दिलेला शब्द पाळणारे शिक्षक आहेत. त्यांचे ‘कला’ क्षेत्रातील कार्य सदैव प्रशंसनीय राहिले आहे.
या कृतज्ञता सोहळ्यास संस्था प्रतिनिधी विद्या राव, द्रविड हाय. चे माजी मुख्याध्यापक नागेश मोने, अरुण देव, शरद चव्हाण, शालेय समिती सदस्य, शिक्षक-सेवक आणि देणगीदार बंधू-भगिनी मोठ्या आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
