साताऱ्यात पालकमंत्री पद मिळून सुध्दा सातारा जिल्हयात शोककळा असलेचे वातावरण दिसून येत आहे-कांचन साळुंखे
सातारा प्रतिनिधी -साता-याच्या जनतेच्या मनातील राजे राज्यात सर्वाधिक मताधिक्य घेवून ते लोकशाहीतील राजे देखील ठरले आहेत, त्यामुळे मा. ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचे फक्त नावाने वारसदार नसून तर सातारा जिल्हयातील जनतेच्या मनातील खरे राजे यांना सातारा जिल्हयाचे पालकमंत्रीपद देवून आदरणीय मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस (देवाभाऊ) यांनी साता-याच्या राजधानीचा सन्मान राखावा अशी मागणी मा.कांचन साळुंखे यांनी सातारा जिल्हा बँकेत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केली केली.
सातारा जिल्हयात प्रथमच लोकसभा व विधानसभा मध्ये भाजपची ताकद असून सुध्दा सातारा जिल्हयाला भाजपचे पालकमंत्री पद मिळाले नसलेमुळे जनतेमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. सातारा जिल्हयामध्ये सर्वात जास्त भाजपाचे आमदार जनतेने निवडून दिले आहेत, तरी सुध्दा भाजपाचा पालकमंत्री सातारा जिल्हयासाठी मिळाला नाही, याची खंत सर्वसामान्यांच्या मनात आहे. पालकमंत्री पदासाठी कोणते निकष लावले गेले आहेत हे स्पष्ट करावे, छत्रपती, शाहू, फुले, क्रांतीवीरांचा व यशवंत विचारांचा सातारा जिल्हा आहे, या जिल्हयात अनेक पालकमंत्री होवून गेले त्यामध्ये आम्ही बघीतलेले पालक मंत्री कै अभयसिंहराजे भोसले, कै. विलासराव पाटील-उंडाळकर, दिलीप वळसे पाटील, ना अजितदादा पवार यांचे कामकाज आम्ही पाहिले आहे. पालकमंत्रीपद हे जिल्हयासाठी दर्जात्मक पद आहे, सातारा जिल्हयाचा चौफेर विकास होणेसाठी या लोकांनी या पदाचा वापर केला व फक्त तालुक्यावर, जिल्हयावर दबाव ठेवणे यासाठी वरील पालकमंत्र्यांनी या पदाचा वापर कधीच केला नाही.
मा. ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले हे सुसंस्कृत, संयमी, जिल्हयातील सर्व नेतेमंडळी यांना बरोबर घेवून विकासाभूमिक निर्णय जबाबदारपणे पार पाडण्याची ताकद, कौशल्य, त्यांचेमध्ये आहे. प्रामुख्याने सातारा जिल्हयाचा व राज्याचा सर्वागिण विकास होणेसाठी ना शिवेंद्रसिहराजे भोसले यांना साताराचे पालकमंत्री पद देवून भाजप पक्षाने त्यांना संधी द्यावी तसेच पालकमंत्री पदाचा निर्णय बदलून ना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सन्मानाने सातारा जिल्हयातील जनतेची आणखी चांगल्या पध्दतीने सेवा करणेची संधी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
पालकमंत्री पदाचा निर्णय बदलवा अन्यथा जिल्हयात होणा-या आगामी स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणूकीत कमळ हाती घेणेस सातारा जिल्हयातील जनतेचा व आमचा नकार असल्याची भूमिका ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचेकडे मांडणार आहोत,तरी सातारा जिल्हयाचा पालकमंत्री पद बदलून त्या ठिकाणी भाजपाचे राज्यात दुस-या नंबरने मताधिक्य घेवून निवडून आलेले ना, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना पालकमंत्रीपद देणेसंबंधी मुख्यमंत्री मा ना देवेंद्रजी फडणवीस (देवाभाऊ) यांना नम्र विनंती करणेत येत आहे, हेच विचार साताराचे खासदार छ.उदयनराजे भोसले यांनी सुध्दा बोलून दाखवले आहेत.सातारा-यात पालकमंत्री पद मिळून सुध्दा सातारा जिल्हयात शोककळा असलेचे वातावरण दिसून येत आहे, याचा गांभीर्याने विचार करुन सातारा जिल्हयाचे पालकमंत्री पद बदलून ना ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सातारा जिल्हयाचे पालकमंत्रीपद द्यावे, ही मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस (देवाभाऊ) विनंती आहे. अन्यथा पालकमंत्री पद बदल होत नाही तोपर्यंत जनतेला उपोषणाचा मार्ग निवडावा लागू नये याची आदरणीय ना, मुख्मंत्री (देवाभाऊ) यांनी दखल घ्यावी.
