Post Views: 68
एकनाथ शिंदेंवरील गाण्यावरुन शिवसैनिक आक्रमक; कुणाल कामराच्या शोच्या सेटची तोडफोड
मुंबई -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने एक गाणं म्हटले. हे गाणं सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल असून कुणाला कामरा आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कुणाल कामराने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्याने गाणं म्हटले आहे.
एकनाथ शिंदेंविरोधात त्याने केलेल्या एका गाण्यावरुन वाद निर्माण झाला असून कुणाल कामराच्याविरोधात आता शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. आमदार मुरजी पटेल यांनी अंधेरीतील एमआयडीसी पोलिस ठाण्यात कामराविरोधात तक्रार दाखल केली आहे. कुणाल कामराला अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
