हिंदवी पब्लिक स्कूल मध्ये एकविसावे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
हिंदवी पब्लिक स्कूल मध्ये भारतीय सण – उत्सव आणि गुरु – शिष्य परंपरा यांचे पावित्र्य राखत एकविसावे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.स्नेहसंमेलनाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. विद्यार्थ्यांना आपल्या भारतीय संस्कृतीमधील सण उत्सवाचे आपल्या जीवनात महत्त्व समजावे तसेच पूर्वीपासून चालत आलेली गुरु – शिष्य परंपरा विद्यार्थ्यांना अवगत व्हावी यासाठी नर्सरी ते इयत्ता चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे भारतीय सण – उत्सव या विषयावर सादरीकरण झाले तर इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी गुरु – शिष्य परंपरेवर सादरीकरण केले.
स्नेहसंमेलनाच्या पहिल्या भागासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महर्षी कर्वे महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय रावसाहेब विधाते सर हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागासाठी प्राथमिक शिक्षक सहकारी बँक मध्ये कार्यरत असलेले आणि साहित्य कला विकास प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष श्रीयुत. प्रदीपजी कांबळे सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
डॉ. विधाते सरांनी आपल्या भाषणात हिंदवीच्या चालू असलेल्या स्तुत्य उपक्रमाबाबत तसेच स्कूलच्या उत्तरोत्तर होत असलेल्या प्रगती बाबत स्कूलचे अध्यक्ष माननीय श्री. अमित कुलकर्णी सर यांचे अभिनंदन केले तसेच पीपीटी द्वारे दाखवल्या गेलेल्या स्कूलच्या सर्व उपक्रमांचे कौतुक केले. भारतीय सण उत्सवा बाबत मार्गदर्शन करून स्कूलच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
श्रीयुत. प्रदीपजी कांबळे यांनी आपल्या दिलखुलास व खुमासदार शैलीने सर्व श्रोतेवर्गाची मने जिंकली. प्राचीन काळापासून चालत आलेल्या गुरु शिष्य परंपरेची महती त्यांनी आपल्या भाषणात सांगितली तसेच हिंदवी मध्ये असे शिष्य घडतात याबद्दल समाधान व्यक्त करून स्कूल बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. अमित कुलकर्णी सर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.भारतीय सण उत्सव तसेच गुरु शिष्य परंपरेबद्दलही कृतज्ञता व्यक्त केली.
स्नेहसंमेलनाप्रसंगी श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय श्री. अमित कुलकर्णी सर, श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी माननीय श्री. नानासाहेब कुलकर्णी सर, खजिनदार सौ.अश्विनी कुलकर्णी मॅडम हिंदवी पंचकोशाधारीत गुरुकुलच्या संचालिका माननीय सौ. रमणी कुलकर्णी मॅडम, स्कूलच्या प्रिन्सिपल सौ मंजुषा बारटक्के मॅडम, व्हाइस प्रिन्सिपल सौ. शिल्पा पाटील मॅडम, चारही विभागाच्या सेक्शन हेड उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्कूलच्या प्रिन्सिपल मंजुषा बारटक्के मॅडम तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय व्हाईस प्रिन्सिपल शिल्पा पाटील मॅडम यांनी दिला. वंदे मातरम ने कार्यक्रमाची सांगता झाली.