मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या प्रयत्नातून १६ वर्षांनंतर रेशनिंग सुरू; १२४ कुटुंबांना दिलासा
वाई तालुक्यातील नागरिकांना दिलासा : १६ वर्षांपासून प्रलंबित असलेला रेशनिंगचा प्रश्न अखेर मार्गी
वाई – तब्बल १६ वर्षांपासून प्रलंबित असलेला रेशनिंग मिळण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, यासाठी मा. नामदार मकरंद आबा पाटील यांच्या विशेष सहकार्यासोबतच बापूराव खरात, सनी चव्हाण, उमेश जायगुडे व मयुर खरात यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळाले आहे.
या उपक्रमांतर्गत नवीन १२४ कुटुंबांना रेशन वाटप करण्यात आले. अनेक वर्षांपासून बंद असलेले रेशनिंग पुन्हा सुरू झाल्यामुळे लाभार्थी कुटुंबांनी समाधान व्यक्त केले आहे.
या कार्यात तहसील कार्यालय पुरवठा विभाग तसेच रेशनिंग दुकानाच्या चालक श्रीमती विजया सुळके यांनी मोलाचे सहकार्य दिले. रेशन वाटप कार्यक्रमास राहुल खरात, प्रसाद कचरे, अक्षय घाडगे, युगल घाडगे, विश्वनाथ जगताप, सागर खरात यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळून ग्रामस्थांकडून समाधान आणि आनंद व्यक्त करण्यात आला आहे.




