मोळाचा ओढा येथील दुभाजकात फोफवली काटेरी झुडपे
फुलझाङे गायब, लाखो रुपयाचा निधी गेला वाया.
संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष, दुभाजकांना कचराकुंङ्याचा विळखा
सातारा- रंगीबेरंगी फुलझाडे व ध्वनी वायू प्रदूषणाला आळा घालण्याबरोबरच सुरक्षित वाहतूक प्रवासासाठी उभारलेल्या दुभाजकात काटेरी झुडपे फौफविल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. सातारचे प्रवेशद्वार असलेल्या मोळाचा ओढा ते महासैनिक भवन पर्यंतच्या दुभाजकात फुलझाडांची रोपे नष्ट झाली असून या जागेवर काटेरी झुङपे व रानटी वृक्ष बहरले आहेत. सुंदर सातारा सुशोभीत सातारच्या संकल्पनेला येथे हरताळच फसला गेला आहे गेल्या अनेक वर्षापासून त्या दुभाजकातील फुलझाडे गायब झाली आहेत संबंधित यंत्रणेच्या गलथान कारभारामुळे दुभाजकातील रंगीबिरंगी मनमोहक फुलझाङाना सातारकर मुकले आहेत. दुभाजकामधील फुलझाडे लागवडीसाठी तयार करण्यात आलेल्या जागेत आता भटक्या कुत्र्यांनी आश्रय घेतला आहे. लाखो रुपये खर्च करून दुभाजकांमध्ये पोयटा माती (गाळ्याची माती) टाकून काही वर्षांपूर्वी या दुभाजकात फुल झाडे लावली होती. काही काळ या दुभाजकातील फुलझाङे डौलाने बहरली होती. या मार्गावरून प्रवास करताना नागरिकांना व प्रवासांना प्रवास सुखद वाटत होता मनाला प्रसन्न वाटत होते काळाच्या ओघात या दुभाजकांमधील फुलझाडाकङे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याने हे दुभाजक आता भकास झाले आहे उगवलेली काटेरी झुङपे ही वाहन चालकांसाठी आता धोकादायक ठरत आहेत वाढलेली झाडे दुभाजकाच्या बाहेर आल्याने वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे याबाबत वृक्षप्रेमी व नागरिकमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
– शहराचे निसर्ग सौंदर्य खुलावे यासाठी दुभाजकामध्ये रंगीबेरंगी व मनमोहक फुलझाडे लावली जातात सातारा शहरातील विविध भागात असणाऱ्या दुभाजकांमध्ये दरवर्षी विविध फुलझाडांची लागवड केली जाते. फुल झाडाच्या निकोप वाढीसाठी दुभाजकात पोयटा ( गाळाची माती) टाकली जाते .यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात सध्या मोळाचा ओढा ते महासैनिक भवन पर्यंतच्या दुभाजकांमधील फुलझाडांच्या ठिकाणी काटेरी झुडपे रानटी झाडे एरंडाचे वृक्ष बरोबरच या दुभाजकात प्लॅस्टिक पिशव्या काचेच्या बाटल्यांचा खच पडल्याचे दिसून येते या दुभाजकाचे आता कचराकुंडीत रुपांतर झाल्याने या मार्गावरून प्रवास करणारे नागरिक विशेषता वृक्षप्रेमी मध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
– मोळाचा ओढा येथील दुभाजकामध्ये फुलझाडे नष्ट झाली असून यासाठीचा लाखो रुपये चा निधी वाया गेला आहे सातारच्या विविध भागात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांचे प्रवेशद्वारच समोर भकास दुभाजकाचे दर्शन घडत आहे रंगीबेरंगी फुल झाडांच्या ठिकाणी उगवलेली काटेरी झुडपे नकारात्मक भावना निर्माण करते दुभाजकांमध्ये पुन्हा नव्याने फुलझाडे लागवड करून सातारचे निसर्ग सौंदर्य खुलवावे हीच अपेक्षा.
श्रीरंग काटेकर सातारा