डॉ.विकास फरांदे सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्त्व : डॉ.मनोहर ससाणे
जनता अर्बन बँकेचे माजी चेअरमन, उत्कृष्ट मॅरेथॉनपट्टू राजकीय, सामाजिक कामात कायम अग्रेसर असणारे आपले मित्र डॉ विकास फरांदे यांचा वाढदिवस जीवनप्रकाश हॉस्पिटलतर्फे केक कापून साजरा करण्यात आला.डॉ. मनोहर ससाणे यांनी बुके, शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले.याप्रसंगी जीवनप्रकाश हॉस्पिटलचे एमडी श्री किशोर बोराटे, विजय तरडे, लक्ष्मण गायकवाड, संजय चव्हाण आणि हॉस्पिटल कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ मनोहर ससाणे यांनी सांगितले की डॉ विकास फरांदे हे एक सामाजिक भान असलेले अष्टपैलू व्यक्तीमत्त्व आहे. वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून सेवा करत असतानाच त्यांनी जनता अर्बन बँकेचे चेअरमन म्हणूनही यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रातही ते कायम अग्रेसर असतात. सातारा येथे होणाऱ्या प्रत्येक मॅरेथॉन मध्ये ते उत्साहाने सहभागी होतात. ते निमा मॅरेथॉन विनरही आहेत. त्याचबरोबर ते रुरल्स हॉस्पिटल ऑनर्स असोसिएशनच्या उप-खजिनदार पदाचाही कारभार पाहत आहेत. या अशा माझ्या मित्राला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांना दीर्घ आरोग्य, आयुष्य लाभो हीच श्रीगणेश चरणी प्रार्थना.
यावेळी बोलताना डॉ विकास फरांदे यांनी सत्काराबाबत आभार व्यक्त केले. तसेच सामाजिक कामाचा वारसा हा मला माझे वडील कै. दत्तात्रय फरांदे (सर) यांच्याकडून मिळाला. आज वाढदिवसानिमित्त अनेकांनी भेटून, फोन करून शुभेच्छा दिल्या. लोकांचे प्रेम पाहून मन भारावून गेले. वर्षभर आपण जे वागलेलो असतो. लोकांच्या उपयोगी पडलेलो असतो. त्यांची पावती मिळण्याचा हा दिवस आहे.
