वाई शेती उत्पन्न बाजार समिती नवीन हळद आवक सुरू उंच्चाकी दर रू.१६१००/- वाई तालुक्यातील पांडवगडावर गिर्यारोहकांवर मधमाशांच्या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी महाराष्ट्र राज्याचे लाङके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस मोठ्या ऊत्साहात साजरा सरदार वल्लभाई हायस्कूल साखरवाडी या शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा शालेय जीवनातील मैत्रीला 23 वर्षानंतर उजाळा ९०वां व्यवसाय प्रारंभ-दिनाच्या निमित्ताने बँक ऑफ महाराष्ट्र व उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटांचा महाकर्ज मेळावा पाचवड येथे संपन्न सायबर गुन्ह्यांना आधुनिक तंत्रज्ञानाने उत्तर द्यावे लागेल’-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » भूगोल अभ्यासकांना करियरच्या अनेक संधी -डॉ.शंकर माने

भूगोल अभ्यासकांना करियरच्या अनेक संधी -डॉ.शंकर माने 

भूगोल अभ्यासकांना करियरच्या अनेक संधी -डॉ.शंकर माने 

सातारा: भूगोल हा शाळा महाविद्यालयातील अध्यापनाचा एक महत्त्वाचा विषय आहे. मात्र या विषयाचे एवढेच मर्यादित महत्त्व नाही. पृथ्वी, पर्यावरण, मानव जाती व प्राणिमात्राच्या दृष्टीने हा एक उपयुक्त विषय आहे. या विषयाच्या अभ्यासकांना संगणक नकाशाकार, पर्यावरणीय सल्लागार, भौगोलिक माहिती प्रणाली अधिकारी, संवर्धन अधिकारी, पुनर्ववापर अधिकारी, पत्रकार, हवामान अंदाज कर्ता, लँडस्केप आर्किटेक, आपत्ती व्यवस्थापन, जमीन मोजणी, सुदूर संवेदन व कृषी पर्यटन याशिवाय स्पर्धा परीक्षा या विविध क्षेत्रांमध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत. यासाठी भूगोलाचा सूक्ष्म व प्रॅक्टिकल बेस्ड अभ्यास आवश्यक आहे असे विचार कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय इस्लामपूरचे भूगोल विभाग प्रमुख डॉ. शंकर माने यांनी व्यक्त केले. ते येथील छत्रपती शिवाजी कॉलेज मधील भूगोल विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित भूगोल सप्ताहाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता प्रो. डॉ. अनिलकुमार वावरे होते.

           ते पुढे म्हणाले की भूगोल हा स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा विषय आहे. मात्र दैनंदिन जीवनात भूगोलाचा अभ्यास अधिक उपयुक्त ठरत असतो. विद्यार्थ्यांनी भूगोलाचा अभ्यास करताना विज्ञान व तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करावा. अध्यक्षीय विचार व्यक्त करताना प्रो. डॉ. वावरे म्हणाले की सध्या जगापुढे अनेक नैसर्गिक व मानवनिर्मित समस्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी भूगोल अभ्यासकांनी संशोधनावर अधिक भर द्यावा. शाश्वत विकासासाठी साधनसंपत्तीचा योग्य पद्धतीने वापर तसेच त्याचे संवर्धन होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याने नोकरीच्या मागे न लागता भूगोलशास्त्राच्या ज्ञानाच्या आधारावर पर्यावरणीय व सामाजिक प्रश्न कसे सोडवता येतील याचा विचार करून त्या संदर्भात उपाययोजना मधून रोजगार निर्मिती करावी. कारण भूगोल विषयामध्ये रोजगार निर्मितीच्या मोठ्या प्रमाणात संभाव्य शक्ती आहेत.

  भूगोल सप्ताहाच्या निमित्ताने महाविद्यालयात चित्रकला, सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा, भिंत्तीपत्रक, फोटोग्राफी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र, नकाशासंग्रह व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. धनंजय नलवडे, प्रा. हिरोजी देशमुख, डॉ. सुभाष कारंडे, डॉ. अभिमान निमसे, डॉ. अभिजीत पोरे, डॉ. सुधाकर कोळी, प्रा. संदीप कोळेकर, डॉ. पांडुरंग व्हटकर, प्रा. जितेंद्र गोडसे, प्रा. सायली यादव, प्रा. योगिता कुंभार यांनी परिश्रम घेतले. कार्यालयीन अधीक्षक तानाजी सपकाळ व शिक्षकेतर सेवक वर्ग यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत भूगोल विभाग प्रमुख व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या आंतरविद्या शाखेचे अधिष्ठाता प्रो. डॉ.रघुनाथ साळुंखे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. नंदा विभुते यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार महाविद्यायाचे उपप्राचार्य डॉ. रामराजे माने-देशमुख यांनी मानले. यावेळी विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

९०वां व्यवसाय प्रारंभ-दिनाच्या निमित्ताने बँक ऑफ महाराष्ट्र व उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटांचा महाकर्ज मेळावा पाचवड येथे संपन्न

Live Cricket