मंत्री ना.श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून ‘सातारा न्यूज मीडिया सेवन’च्या दिवाळी अंकाचे कौतुक दिवाळी अंक वाचनीय परंपरेचा सुंदर वारसा जपणारा उपक्रम
सातारा (प्रतिनिधी) : गेली चार वर्षांहून अधिक काळ सातत्याने दिवाळी अंक प्रकाशित करून मराठी वाचनीय परंपरा जपण्याचे मोलाचे कार्य ‘सातारा न्यूज मीडिया सेवन’ करत आहे. या उपक्रमाचे महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री मा. नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विशेष कौतुक करून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी समाजसेवक फिरोज पठाण, पत्रकार नलावडे आणि पत्रकार अली मुजावर यांची प्रमुख उपस्थिती होती.दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘सातारा न्यूज मीडिया सेवन’चा आकर्षक रंगीत छपाईतील दिवाळी अंक वाचकांसाठी उपलब्ध झाला आहे. सातत्य, दर्जेदार लेखन आणि मराठी संस्कृतीशी नाळ जोडणारा हा दिवाळी अंक वाचकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवत आहे.दिवाळी अंकाच्या या उपक्रमामुळे मराठी वाचनसंस्कृतीला नवी ऊर्जा मिळत असल्याचे मत अनेक वाचकांनी व्यक्त केले आहे.




