Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » दिव्यांग बंधू- भगिनींचे जीवन सुसह्य केल्याचे समाधान सौ.वेदांतिकाराजे;’कर्तव्य’च्या जयपूर फूट शिबिराचा शेकडो दिव्यांगांना लाभ

दिव्यांग बंधू- भगिनींचे जीवन सुसह्य केल्याचे समाधान सौ.वेदांतिकाराजे;’कर्तव्य’च्या जयपूर फूट शिबिराचा शेकडो दिव्यांगांना लाभ        

दिव्यांग बंधू- भगिनींचे जीवन सुसह्य केल्याचे समाधान सौ.वेदांतिकाराजे;‘कर्तव्य’च्या जयपूर फूट शिबिराचा शेकडो दिव्यांगांना लाभ          

भुईंज [ महेंद्रआबा जाधवराव ] दिव्यांग बंधू- भगिनी, दीनदुबळ्या आणि जेष्ठांच्या पाठीशी कर्तव्य सोशल ग्रुप नेहमीच भक्कमपणे उभा राहिला आहे. मोफत नेत्रचिकित्सा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, जयपूर फूट शिबीर, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर असे उपक्रम राबवून कर्तव्य सोशल ग्रुपने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. मोफत जयपूर फूट शिबिराचा लाभ आजवर हजारो दिव्यांगांना झाला आहे. कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून दिव्यांग बंधू- भगिनींचे जीवन सुसह्य करता आले, याचे समाधान आहे, असे प्रतिपादन ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले. 

               स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले यांच्या स्मरणार्थ कर्तव्य सोशल ग्रुप आणि साधु वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने छ. शाहू अकॅडमी विसावा नाका सातारा येथे मोफत कृत्रिम हात व पाय बसवणे (जयपूर फूट) शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उदघाटनप्रसंगी सौ. वेदांतिकाराजे बोलत होत्या. या शिबिरात ३०० दिव्यांगांच्या हात व पाय यांचे माप घेण्यात आले. या सर्वांना ३० दिवसात मोफत कृत्रिम हात व पाय बसवून दिले जाणार आहेत. या उपक्रमामुळे आम्हाला कृत्रिम अवयव उपलब्ध झाला असून त्यामुळे आम्हाला दैनंदिन कामकाज सुलभ होत असते, अशी प्रतिक्रिया देत उपस्थित दिव्यांग व त्यांच्या नातेवाईकांनी सौ. वेदांतिकाराजे व ग्रुपचे आभार आभार मानले.  

            शिबिरात साधू वासवानी मिशनच्या तज्ज्ञ पथकाने दिव्यांगांच्या हात व पायाची मापे घेतली. 

शिबीर यशस्वी करण्यासाठी साधू वासवानी मिशनचे मिलिंद जाधव, सुशील ढगे, सलील जैन, कर्तव्य ग्रुपचे राजू महाडीक, विजय देशमुख, विलास कासार, दीपक भोसले, महेश यादव, रविंद्र पवार, चंद्रकांत बेबले, सुहास वहाळकर, संदीप भणगे, महेंद्र गार्डे, चंदन घोडके, डी पी शेख, मधुकर शेंबडे, अनिल सोनमळे, समीर खरात, मधुकर बापू पवार आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जन सुरक्षा विधेयक विधिमंडळात तात्काळ मागे घेणे विषयी जिल्हाधिकारी सातारा यांना अँटी करप्शन ऑफ ब्युरो इंडिया तर्फे देण्यात आले निवेदन 

Post Views: 122 जन सुरक्षा विधेयक विधिमंडळात तात्काळ मागे घेणे विषयी जिल्हाधिकारी सातारा यांना अँटी करप्शन ऑफ ब्युरो इंडिया तर्फे

Live Cricket