जिल्ह्यात यापुढे रस्त्यावर दिसणारा ट्रॅक्टर कूपरचा असेल श्रीमंत छत्रपती ना.शिवेंद्रराजे भोसले
सातारा-कुपरसमूहाने ट्रॅक्टर निर्मितीत पदार्पण करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. यापुढेही कूपर जे कारखाने उभे करणार आहेत ते सातारच्या भूमीतच उभे करणार असल्याचे सांगितले यावरून त्यांचे जिल्ह्यावरील प्रेम दिसून येत आहे.जिल्ह्यात यापुढे रस्त्यावर दिसणारा ट्रॅक्टर हा कूपरचाच असेल असा विश्वास मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केला.
कूपर कॉर्पोरेशनच्या अत्याधुनिक ट्रॅक्टर प्लांट चे उद्घाटन मंत्री नामदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते व्यासपीठावर आमदार महेश शिंदे कूपर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष फरोख कूपर, संचालिका महारोख कूपर,माजी आमदार प्रभाकर घार्गे, एडवोकेट मनीषा कुपर,नंदू रांगणेकर,आदी मान्यवर उपस्थित होते
ना शिवेंद्रराजे पुढे म्हणाले कुपर व आमच्या घराण्याचे फार जुने ऋणानुबंध असून कूपर समूहाला जे सहकार्य लागेल ते करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
आ.महेश शिंदे म्हणाले औद्योगिक वसाहती या आपल्यासाठी मंदिर आहेत ती जपली वाढवली पाहिजेत उद्योग जगताला ताकद देण्याची गरज आहे कूपर परिवाराची ट्रॅक्टर निर्मिती संकल्पना चांगले असून लोकांनी ट्रॅक्टर खरेदी करताना कुपर समूहाच्या ट्रॅक्टरची निवड करावी असे आवाहन आमदार महेश शिंदे यांनी यावेळी केले.
व्यवस्थापकीय संचालक फरोख कुपर म्हणाले माझे सुरुवातीपासूनचे शिक्षण हे शेती विषयाशी निगडित होते अचानक घरातून कंपनी चालवण्याची जबाबदारी देण्यात आली मला स्वप्नातही वाटत नव्हते मी ट्रॅक्टर निर्मिती करू शकेल मात्र हे स्वप्न अखेर पूर्ण झाले याचा मला आनंद आहे. कूपर समूहाच्या या यशस्वी वाटचालीत आई व पत्नीची भक्कम साथ मिळाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.कूपर उद्योगाची अनेक उत्पादने परदेशात जात असल्याचे यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले.
सातारा औद्योगिक वसाहतीत कूपर टॅक्टर प्लांट चे उद्घाटनानंतर मान्यवर ग्राहकांना ट्रॅक्टर चाव्यांचे वितरण करण्यात आले. यामध्ये बुर्गीस बलसारा (मुंबई) दिलीपराव नलवडे सातारा, सुनील जमदाडे वाई तसेच ज्ञानेश्वर बिरदार उदगीर जिल्हा लातूर यांना चाव्या प्रदान करण्यात आल्या.कार्यक्रमास अनेक मान्यवर कंपनीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कुपर उद्योग समूहातील, अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.
