अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे रिपाइं आठवले गटाचे अर्धनग्न आंदोलन

जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे रिपाइं आठवले गटाचे अर्धनग्न आंदोलन

जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे रिपाइं आठवले गटाचे अर्धनग्न आंदोलन

सातारा -फलटण तालुक्यातील साखरवाडी ग्रामपंचायत कार्यालयामागे पडीक असणारी जागा बुद्ध विहारासाठी देण्यात यावी यासाठी २६ वर्षांपासून लढा सुरू आहे. यासाठी फलटण तहसील कार्यालयासमोर ४३ दिवसांपासून आंदोलन सुरू असून याबाबत दखल घेतली जात नाही. त्यामुळे ही जागा तातडीने मंजूर करावी, या मागणीसाठी रिपाइं आठवले गटाच्यावतीने जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करत सरकारविरोधात मोठया प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली.

साखरवाडीतील बुद्ध विहाराच्या जागेसाठी बौद्ध समाजाचे जनआंदोलन सुरु आहे. बुद्ध विहाराला साखरवाडीत उपलब्ध असलेली ८ गुंठे महाराष्ट्र शासनाची जागा बुद्ध विहाराला द्या. बौद्ध समाजावर होणारा अन्याय थांबवा. शासनाच्या विविध योजनांमध्ये धार्मिक स्थळांची जागा मंजूर केल्या जातात त्याच धर्तीवर बुद्धविहाराला जागा मंजूर करावी. बुद्ध विहाराबाबत होणार राजकीय हस्तक्षेप थांबवावा. लवकर जागा मंजूर करून बौद्ध समाजाला न्याय द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

अशोक गायकवाड म्हणाले, आता अस्तित्वाच्या लढ्याची सुरुवात आहे. कित्येक वर्षे बुद्ध विहारासाठी संघर्ष सुरू आहे. पण आज तो निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. हा लढा केवळ जागेसाठी नाही, तर बौद्ध समाजाच्या अस्मितेचा  आहे.तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.यावेळी स्वप्निल गायकवाड, आप्पा तुपे, पूजा बनसोडे, अक्षय साळवे, विजय येवले, संतोष गायकवाड, शिवाजी सर्वागोड, श्रीकांत निकाळजे, एकनाथ रोकडे, उत्तम कांबळे, जॉन जोसेफ, प्रतिक गायकवाड, आदित्य गायकवाड उपस्थित. यावेळी सातारा जिल्ह्यातील रिपाई चे अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket