Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » म्हासोली – येवतीच्या भैरवनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप 

म्हासोली – येवतीच्या भैरवनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप 

म्हासोली – येवतीच्या भैरवनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

कराड :सम्यक प्रेरणा सामाजिक प्रतिष्ठान कराड, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे फाउंडेशन, शेवाळवाडी म्हासोली आणि आदर्श ग्रामविकास समिती शेवाळवाडी म्हासोली यांच्या संयुक्त विद्यमाने शेवाळवाडी म्हासोली ता.कराड येथील भैरवनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

      या विद्यालयामध्ये परिसरातील दुर्गम व डोंगरी भागातील 165 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदत केली जाते. त्याचप्रमाणे कराड येथील सम्यक प्रेरणा सामाजिक प्रतिष्ठान,कै.आबासो साठे यांच्या स्मरणार्थ श्री.संजय साठे यांचे कडून सचिव साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे फाउंडेशन व आदर्श ग्राम विकास समिती शेवाळवाडी यांचे माद्यमातून आणि 

माजी पोलीस पाटील कै. यशवंत साठे यांच्या स्मरणार्थ ग्रामविकास अधिकारी संतोष साठे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वह्या व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.तसेच या विद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री संतोष साठे यांची ग्रामविकास अधिकारी म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला, आणि गावातील विध्यार्थी यांनी चांगले शिक्षण घ्यावे यासाठी प्रयत्न करणारे लाला साहेब पाटील यांचा ही यावेळी सत्कार घेण्यात आला.कार्यक्रमात सम्यक प्रेरणा सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. श्रीधरपंत सवाखंडे , सम्यक प्रेरणा सामाजिक प्रतिष्ठानचे सचिव विद्याधर गायकवाड, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे फॉउंडेशन चे सचिव श्री.संजय साठे, ग्राम विकास अधिकारी श्री.संतोष साठे, आदर्श ग्राम विकास समितीचे सदस्य व शिक्षण प्रेमी लालासाहेब पाटील, श्री.महेंद्र शेवाळे, श्री.सचिन शेवाळे, अमन साठे, यांच्यासह संस्थाचे पदाधिकारी,कार्यकर्ते ग्रामस्थ व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ.जयश्री पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.बजरंग नलवडे यांनी केले तर आभार श्री.माळी सर यांनी मांडले

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

उत्कर्षाच्या शिखरावर कार्यक्रमात प्रा नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न. 

उत्कर्षाच्या शिखरावर कार्यक्रमात प्रा नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न.  उत्कर्ष पतसंस्था आयोजित “उत्कर्षाच्या

Live Cricket