दिशा ॲकॅडमीचे विद्यार्थी झळकले महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट (MHT CET) परीक्षेत
दिशा ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे जेईई ॲडव्हान्स परीक्षेतील यश लखलखत असतानाच महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट अर्थात MHT CET परीक्षेच्या निकालात सुद्धा विद्यार्थ्यांनी भरघोस यश मिळवले आहे. तब्बल ८० विद्यार्थ्यांनी ९०पर्सेंटाइल पेक्षा जास्त गुण मिळवले आहे. ८० पर्सेंटाइल पेक्षा जास्त गुण मिळवणारे १२६ विद्यार्थी आहेत. ९९.८४ पर्सेंटाइल गुण मिळविणारा *सनल बेलोसे* हा विद्यार्थी दिशा ॲकॅडमीत पहिल्या क्रमांकावर आहे. ९८ पर्सेंटाइलपेक्षा जास्त गुण मिळविणारे १९ विद्यार्थी, ९५ पर्सेंटाइलपेक्षा जास्त गुण मिळविणारे ५३ विद्यार्थी, ९० पर्सेंटाइलपेक्षा जास्त गुण मिळविणारे ८०विद्यार्थी, ८० पर्सेंटाइलपेक्षा जास्त गुण मिळविणारे १२६ विद्यार्थी आहेत. उत्तंग यशाचा हा टप्पा नजरेत भरणारा आहे.
दिशा ॲकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन कदम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले; कोणतीच परीक्षा ही अवघड नसते, अगदी सुरुवाती पासून तयारी केली तर सर्व सोपे जाते. त्यादृष्टीनेच दिशा ॲकॅडमीने विद्यार्थ्यांची सर्वांगीण तयारी करून घेतली आणि मिळालेले यश हीच ॲकॅडमीच्या सर्व्वोत्तम शिक्षण व विद्यार्थ्यांच्या परिश्रमाची पोहचपावती आहे.
महाराष्ट्र राज्यातील अंडरग्रेजुएट इंजिनीअरिंग आणि फार्मसी प्रोग्राम्समध्ये प्रवेश घेण्यासाठी महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट (MHT CET) ही स्पर्धात्मक परीक्षा विद्यार्थ्यांसाठी महत्वाची असल्याचे अधोरेखित करत दिशाच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रा. रूपाली कदम यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले आहे.
दिशाचे शिक्षण विभाग प्रमुख सतीश मौर्य यांनी यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन करत त्याना पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. परीक्षेचे स्वरूप, नियोजनबद्ध अभ्यासक्रमाचा अभ्यास, सराव, वेळेचे व्यवस्थापन, अपडेट राहाण्याबरोबरच निरोगी रहाणे, स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आणि समर्पण ही यशाची सुत्री अवलंबली तर यश निश्चित मिळतेच असेही सतीश मौर्य म्हणाले. दिशा ॲकॅडमीतील यशस्वी महाराष्ट्रातील पदवीपूर्व अभियांत्रिकी किंवा फार्मसी प्रोग्राममध्ये प्रवेश घेण्यासाठी उत्सुक आहेत. महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट (MHT CET) परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना ॲकॅडमीतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.