सदाशिवगड येथील माध्यमिक शाळेत दिंडी सोहळ्याचे आयोजन
तांबवे –आषाढी एकादशीचे औचित्य साधून सदाशिवगड हजारमाची ता. कराड येथील यशवंत शिक्षण संस्थेचे माध्यमिक विद्यामंदिरात विद्यार्थी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या दिंडीमधील पालखीतील संत ज्ञानेश्वरी,संत तुकाराम महाराज ग्रंथाचे पूजन संस्था सचिव ज्ञानेश्वर पाटील यांनी केले. यावेळी संचालक राजेंद्र काटवटे उपस्थित होते. दिंडीमध्ये वेशभूषेतील विठ्ठल ,रुक्मिणी यांनी गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले तसेच वारकरी वेशातील लहान मुले मध्यभागी पालखी भगव्या पताका टाळ मृदंग वाजवत ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज यांच्या जयघोषात विठू नामाचा गजर अशा वातारणामध्ये दिंडी सोहळा रंगला.या बाल वारकरी दिंडी सोहळ्याचे शाळेच्यावतीने वतीने नियोजन मुख्याध्यापिका मनिषा पानवळ यांनी केले. दिंडी सोहळ्याचे स्वागत ठिक- ठिकाणी महिलांनी औक्षण करून केले. विद्यालयाच्या प्रांगणात व जोतिबा मंदिरा समोर रिंगण सोहळा रंगला.झिम्मा, फुगडी हे खेळ मुली खेळल्या. या दिंडी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी ए.ए. जाधव, टी .आर राजमाने, एस. डी.वेताळ, आर. एम.अपिने, एस.एस शेळके, एस.पी. गोसावी , एस. एम.पोळ, ए ए पाटील आदी शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचारी सी.डी.डुबल व ओंकार रांगोळे व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्यांचे योगदान लाभले.