ध्यास फाउंडेशन आयोजित दीपस्तंभ नारी सन्मान पुरस्काराचे मान्यवरांच्या हस्ते वितरण
सातारा: आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ध्यास फाउंडेशन आयोजित दीपस्तंभ नारी सन्मान पुरस्काराचे वितरण 16 मार्च 2025 रोजी श्री. नितीन तारळकर जिल्हा क्रीडा अधिकारी, श्री वसंत शिंदे ज्येष्ठ साहित्यिक व प्रोप्रायटर शिंदे फर्निचर सातारा आणि श्री अमेय भागवत, न्यूट्रिशन आणि डायटीशियन यांच्या उपस्थितीत पार पडला.
नऊ महिलांचा सत्कार करत असताना त्यांच्या कार्याचा गुणगौरव करण्यात आला. कर्जत ,औंध , फलटण,सांगली, नगर , पुसेगाव व सासवड आणि सातारा या विविध ठिकाणाहून महिलांनी प्रतिनिधित्व केले. सौ विमल मुंडे या आदिवासी भागात नवनवीन शैक्षणिक उपक्रम राबवीत असतात त्याचबरोबर अंध विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे मौल्यवान काम करत आहे. सौ कुमुदिनी पांढरे या सासवडमध्ये 25 वर्ष पेक्षा जास्त महिलांच्यासाठी विविध उपक्रम राबवून महिला सक्षमीकरणाचे काम करत आहे. डॉक्टर नीलम शिंदे या संवेदना तर्फे समाजातील अतिशय संवेदनशील वृद्धांसाठी कार्यरत आहेत. एडवोकेट सुचित्रा काटकर मॅडम साहित्याच्या माध्यमातून संस्कार रुजवण्याचे काम करीत आहेत तर एडवोकेट कांचन कनौजा खरात या कोर्टाबाहेर सामुपचाराने केसेस सोडवण्याचा प्रयत्न करत आहे.
महिलांसाठी शौचालयाच्या मागणीसाठी पाठपुरावा करणे त्यांना सक्षम करणे अशा प्रकारचे काम त्या करत आहे . डॉक्टर शुभांगी गायकवाड या योगा व धाव क्रियातून महिलांच्या शारीरिक व मानसिक संवर्धनासाठी कार्यरत आहे. कुमारी शैला यादव या भटक्या व विमुक्त महिलांच्या शिक्षणाच्या कार्यरत आहे. सौ. हेमलता फडतरे सेवानिवृत्तीनंतर शहीद पत्नींसाठी जीवन झोकून कार्यरत आहे.
श्री.नितीन तारळकर व श्री वसंत शिंदे यांनी आपल्या सद्भावना सर्व महिलांना दिल्या व ध्यास फाउंडेशन यांच्या कार्याचा गौरव केला. नितीन तारळकर यांनी खेळाचे महत्व व स्त्री विकास याचे महत्त्व विशद केले तर श्री वसंत शिंदे यांनी महिला दिनाचा इतिहास सांगत महिला कालची व आजची यावरती दोन कविता सादर केल्या.
कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश वंदन करुन झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय ध्यास फाउंडेशनच्या संस्था अध्यक्ष डॉक्टर वैजयंती ओतारी यांनी केले सत्कारमूर्तींचा परिचय डॉक्टर सरिता नाईक , सौ सुप्रिया जाधव व सौ धनश्री जगताप यांनी केले. आभार एडवोकेट सुरेश रुपनवर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ . पदमा ओतारी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. याप्रसंगी श्री अमेय भागवत, श्री सुनील जाधव, श्री संतोष कदम व इतर मान्यवर आणि महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.
