Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » धन्वंतरी पतसंस्थेच्या यशाचे मर्म धन्वंतरी पतसंस्थेचा आज ३६ वा वर्धापनदिन

धन्वंतरी पतसंस्थेच्या यशाचे मर्म धन्वंतरी पतसंस्थेचा आज ३६ वा वर्धापनदिन 

धन्वंतरी पतसंस्थेच्या यशाचे मर्म धन्वंतरी पतसंस्थेचा आज ३६ वा वर्धापनदिन 

आजवरच्या वाटचालीत त्यांनी काळानुरुप केलल्या सुधारणा, आव्हानांचा केलेला सामना, स्पर्धेत टिकवून राहण्याची क्षमता, नियोजन, काटकसर आणि अथक परिश्रम यामुळे गाठलेले प्रगतीचे उत्तुंग शिखर या प्रवासाचा घेतलेला त्या निमित्ताने आढावा.

सहकार भूषन धन्वंतरी पतसंस्थेची स्थापना १६ ऑक्टोबर १९८९ रोजी झाली. याच दरम्यान अनेक सहकारी पतसंस्था, बँका स्थापन झाल्या. साधारण ३६ वर्षाच्या काळात धन्वंतरी पतसंस्थेच्या बरोबरीच्या बँका, पतसंस्था एकतर बंद झाल्या किंवा ज्या काही थोड्याफार शिल्लक राहिल्या आहेत त्या कसे तरी आपले अस्तित्व टिकवून आहेत. परंतु धन्वंतरी पतसंस्थेने आपले अस्तित्व शाबूत ठेवून ते दिवसेंदिवस वृद्धिंगत ठेवत राज्याच्या सहकार क्षेत्रात आपला ठसा उमटवत प्रगतीची घोडदौड सुरू ठेवली आहे. संस्था चालवणे तुलनेने सोपे आहे परंतु संस्थेचा पाया मजबूत करत सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विचार भिन्नता  असलेल्या लोकांना सहकाराचा, आर्थिक बचतीचा विचार करण्यास प्रवृत्त करून त्यांना व त्याचबरोबर संस्थेलाही प्रगतीच्या प्रवाहात सहजगत्या आणण्याचे महत्वाचे कार्य धन्वंतरी पतसंस्थेने करून दाखविले आहे. याच उद्देशाने व प्रेरणेने धन्वंतरी पतसंस्थेचे संस्थापक व मुख्य प्रवर्तक डॉ. रवींद्र भोसले यांनी त्यांचे एकनिष्ठ सहकारी कै. डॉ.क.श्री.लाहोटी, डॉ. कांत फडतरे, डॉ. शिरीष भोईटे, डॉ.अरविंद काळे, डॉ.शकील अत्तार व इतर सहकारी यांना बरोबर घेवून ३६ वर्षापूर्वी धन्वंतरी पतसंस्थेची स्थापना केली. सुरुवातीचे रू. ६१,७०० ते आजचे रू. २३३ कोटी असा संस्थेच्या भांडवलाचा प्रवास हा प्रगतीचा आलेख दशविणारा आहे. २५१ सभासदांवर सुरू झालेली पतसंस्था आजमितीस १४००० इतके सभासद एकविचाराने व एकदिलाने संस्था हिताच्या दृष्टीने काम करत आहेत. आज अखेर संस्थेकडे १६० कोटीपेक्षा जास्त ठेवी असून संस्थेला नेहमी सर्वोच्च ऑडीट वर्ग अ मिळाला आहे. पारदर्शक कामकाजाची पध्दत अनुसरल्याने संस्थेची वाटचाल गत छत्तीस वर्षात लक्षवेधी ठरली आहे.

स्पर्धात्मक युगात पतसंस्था बळकट व्हाव्यात म्हणून शासनाने त्यांचे निकषाप्रमाणे गुणांवर आधारित ऑडिटची पद्धत लागू केली. यामध्ये धन्वंतरी पतसंस्था स्थापनेपासूनच प्रत्येक वर्षी सर्वोच्च ऑडिट वर्ग ‘अ’ मिळवित आहे. काळ बदलत गेला तसे शासनाचे नियंत्रण कडक होत गेले. त्याचाच एक भाग म्हणजे एन.पी.ए. चे निकष लागू झाले. आज अखेर पतसंस्थेने १०० % एन.पी.ए. ची तरतूद केलेली आहे. सातारा शहरात शनिवार पेठ व सदरबझार तसेच कोरेगांव, फलटण, कराड व पुणे जिल्ह्यात धनकवडी व पिंपरी चिंचवड या ठिकाणी शाखा कार्यरत असून मुख्य कार्यालयासह सर्व शाखा स्ववास्तूत कार्यरत आहेत.

सर्व पतसंस्थांपेक्षा कमी व्याजदराने कर्ज देणारी एकमेव पतसंस्था तसेच इतर बँकाप्रमाणे आपल्या संस्थेनेही ग्राहकांना डिजिटल सेवा दयावी तसेच त्यांचे व्यवहार सुलभ व त्वरित व्हावेत हा हेतू मनात ठेवून मा. संचालक मंडळाने अत्याधुनिक ऑनलाईन सीबीएस संगणक प्रणाली सुरक्षिततेसाठी स्वतःच्या डाटा सेंटरसह करण्याचा निर्णय घेतला. सदर सीबीएस प्रणाली सतत म्हणजेच २४ तास विनाखंड कार्यरत रहावी याकरीता आधुनिक फायबर इंटरनेट, युपीएस, जनरेटर इ. बाबी संस्थेमध्ये कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. आधुनिक प्रणालीमुळे संस्थेच्या ग्राहकांना इंटरनेट बैंकिंग, ऑनलाईन बँकिंग, मोबाईल अॅप्लिकेशन, इ. सुविधा विनासायास मिळत आहेत.

संस्थेचे ग्राहक स्वतःच्या बँक खात्यातून संस्थेच्या खात्यामध्ये रक्कम एनईएफटी, आयएमपीएस, आरटीजीएस द्वारे व्यवहार करू शकतात. तसेच विविध बँकिंग अॅप उदा. जीपे, फोनपे, पेटीएम द्वारेही संस्थेचे खात्यामध्ये रक्कम जमा होत आहे यामुळेच एपीआय प्रणाली वापरणारी धन्वंतरी पतसंस्था ही महाराष्ट्रातील पहिली संस्था ठरली आहे. अशा प्रकारे डिजिटल धन्वंतरीचे स्वप्न पूर्ण करताना आपणा सर्वांना विशेष आनंद होत आहे. तसेच सातारा शाखेच्या ठिकाणी सुरक्षित लॉकर्स सुविधाही अल्पदरात मिळत आहे. संस्थेकडे वसूल भागभांडवल रु. ११ कोटीचे वर तसेच ठेवी रु. १६० कोटीच्या वर आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे ठेवीदारांचा संस्थेवर असलेला प्रचंड विश्वास तसेच सदर भांडवलातून संस्थेने रु. १२९ कोटीचेवर कर्जवाटप केले आहे. तसेच रु. ९५ कोटीचे वर सुरक्षित व उत्तम बँकामध्ये गुंतवणूक केली आहे. तसेच निव्वळ एन.पी.ए. चे प्रमाणही ३ चे आत राखले आहे. सहकार क्षेत्रामधील विविध नामांकित संस्था तसेच शासनाच्या सहकार विभागाकडून वेळोवेळी एकूण २७ पुरस्कारांनी सन्मानित झालेली एकमेव धन्वंतरी पतसंस्था आहे याचा सार्थ अभिमान आपणा सर्वांना आहे. मा. संचालक मंडळाने मार्च २०२६ अखेर ३०० कोटीचा व्यवसाय व ०% निव्वळ एनपीए करण्याचा संकल्प केला आहे ही कौतुकाची गोष्ट आहे. संस्थेच्या या यशामागे संस्थापक संचालकांसह, माजी संचालक, विद्यमान संचालक, आजी माजी सेवक यांचे निस्पृह योगदान आहे. संस्था आपल्या ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे देत असलेल्या सेवेमुळे दिवसेंदिवस ग्राहक वर्ग वाढत आहे. बँकिंग सेवा हा प्रत्येक सेवकाचा रोजच्या जगण्याचा, जीवनशैलीचा भाग असला पाहिजे अशी धन्वंतरी पतसंस्थेची भूमिका आहे. त्याचबरोबर संचालक मंडळ व इतर समितीच्या होत असलेल्या सभांमध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण व संस्थेचे हित समोर ठेवून सखोल चर्चा होवून निर्णय घेतले जातात व त्याच्या अंमलबजावणीकडेही काळजीपूर्वक लक्ष दिले जाते यामुळे संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. धन्वंतरी पतसंस्थेची प्रगतीची घोडदौड महाराष्ट्र राज्यात ज्यांनी होमिओपॅथी क्षेत्रात ऋषीतुल्य कार्य केलेले व राज्य सहकारी पतसंस्थांचे फेडरेशनचे संचालकपदी कार्यरत असलेले असे धन्वंतरी पतसंस्थेचे संस्थापक व चेअरमन डॉ. रवींद्र भोसले यांच्या प्रभावी, सक्षम व अभ्यासू नेतृत्वाखाली सुरू आहे. तसेच संस्थापक संचालक व विद्यमान व्हा. चेअरमन डॉ. कांत फडतरे हे देखील सातारा जिल्हा पतसंस्थांचे फेडरेशनच्या संचालक पदाची जबाबदारी सांभाळत आहेत तसेच संस्थापक संचालक डॉ. अरविंद काळे हे साता-यातील आनंदाश्रम या संस्थेचे अध्यक्षपदी कार्यरत असून ते कांतीस्मृती व्यायाम मंडळावरती संचालक म्हणून काम करीत आहेत व डॉ. शिरीष भोईटे, डॉ. शकील अत्तार यांनीही जनरल प्रॅक्टिशनर असोशियन व इतर सामाजिक संस्था वरती विविध पदावर कार्य केले आहे. संस्थेला यापूर्वी संस्थापक संचालक कै. डॉ. क. श्री. लाहोटी यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे. याचबरोबर प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.श्रीहरी डिंगणे त्यांच्या सहका-यांसोबत आजमितीस संस्थेच्या व्यवस्थापनाची धुरा मा.संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली समर्थपणे सांभाळत आहेत. वरील संस्थापक संचालकांच्यासह विद्यमान संचालक डॉ.सुनील कोडगुले, अॅड. सूर्यकांत देशमुख, तसेच प्रसिद्ध करसल्लागार श्री अरूण गोडबोलेसाहेब यांचे मार्गदर्शन, सल्लागार, हितचिंतक, व सेवक वर्गाचा मोलाचा सहभाग आहे.

कोणत्याही संस्थेबरोबर आर्थिक व्यवहार करताना सदर संस्थेचे संचालक, नेतृत्व करणारी व्यक्ती यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांचे  अवलोकन करूनच लोक व्यवहार करत असतात. त्याचप्रमाणे डॉ. रवींद्र भोसलेसर यांच्या रोजच्या वागण्यातील सहजता, सर्वाप्रती व्यक्त होणारा स्नेहभाव, सर्वांना सामावून घेण्याची सामूहिकता, पारदर्शी व निरपेक्ष पद्धतीचे कामकाज यामुळे त्यांचेवर सर्व संचालक व सभासदांचा असलेला प्रचंड विश्वास हा सुध्दा संस्थेच्या यशाचा महत्वाचा भाग आहे या मुळेच धन्वंतरी पतसंस्थेने आपले वेगळेपण टिकवून ठेवले आहे.

सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेने संस्थेने सभासदांना मोफत वाचनालय व विविध समारंभासाठी धन्वंतरी हॉल इ. गोष्टी सुरू केल्या आहेत तसेच वाढवलेल्या कार्यक्षेत्रामध्ये निवडक जिल्हयात शाखा विस्तार करणे, प्रशस्त अशी प्रशासकीय इमारत उभारणे तसेच यापूर्वी आपण महाराष्ट्र शासनाचा सहकार भूषण हा मानाचा पुरस्कार मिळविला आहे या पुढेही आपणा सर्वांच्या सहकार्याने, सहभागाने शासनाचा सर्वोच्च असा सहकार महर्षी पुरस्कार आपण मिळवू असा ठाम विश्वास मा.संचालक मंडळास आहे. कोणत्याही राजकारणाचा स्पर्श नसलेली, पारदर्शक व्यवहार जपणारी, ग्राहकांना केंद्रबिंदू मानून त्यांना विनम्र व सोयीची सेवा देणारी तसेच सहकाराच्या तत्त्वानुसार  व समर्पित भावनेने काम करणारे मा. संचालक मंडळ व सेवक वर्ग यामुळेच आज संस्थेच्या यशाचा वेलू गगनावरी गेला आहे. यापुढेही आपणा सर्वांचे सहकार्य, सहभाग असाच मिळत राहो ही धन्वंतरी चरणी प्रार्थना. जय सहकार

श्री.संजय यादवराव पवार, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी धन्वंतरी नागरी सह.पतसंस्था मर्या., सातारा

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नशामुक्त भारत अभियान अंतर्गत QR कोड स्कॅन करून व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेण्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन

Post Views: 63 नशामुक्त भारत अभियान अंतर्गत QR कोड स्कॅन करून व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेण्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन सातारा-भारत

Live Cricket