धन्वंतरी पतसंस्थेमध्ये धन्वंतरी जयंतीचा कार्यकम व धन्वंतरी याग” उत्साहात संपन्न
सहकार क्षेत्रात संपूर्ण महाराष्टात आदर्शवत व सक्षम असलेल्या धन्वंतरी नागरी सह. पतसंस्थेमध्ये धन्वंतरी जयंतीचा कार्यकम अतिशय आनंदी व उत्साहाच्या वातावरणात मुख्य कार्यालयात पार पडला.धन्वंतरी देवतेचे पुजन प्रसिध्द शल्यचिकित्सा तज्ञ डॉ. संभाजी सांळूखे तसेच आयुर्विदया पारंगत डॉ. मोहन तांबे यांचे हस्ते करण्यात आले. तसेच धन्वंतरी जयंतीनिमित्त सर्व सभासद, ठेवीदार, हितचिंतक व धन्वंतरी परीवाराच्या निरोगी आयुष्यासाठी “धन्वंतरी याग” करण्यात आला.
सदर प्रसंगी बोलताना संस्थापक चेअरमन डॉ. रविंद्र भोसले म्हणाले, आपणां सर्वाच्या सहकार्याने धन्वंतरी पतसंस्था राज्यात प्रथम क्रमांकाची सक्षम पतसंस्था झाली आहे याचा मनस्वी आनंद होत आहे. आजमितीस संस्थेकडे १६१ कोटींचेवर ठेवी असून १३२ कोटी रुपयाचे कर्जवितरण केले असून संस्थेचा एकूण व्यवसाय २९३ कोटी रुपये झाला आहे. तसेच ९४ कोटी रुपये इतक्या रकमेची सुरक्षित गुंतवणूक विविध सक्षम बँकामध्ये संस्थेने केली आहे. संस्था सुरुवातीपासूनच कर्जवसुली बाबत दक्ष राहील्यामुळे पतसंस्थेच्या कर्जदारांनाही नियमित हप्ते भरण्याची सवय लागली आहे. संस्थेचे सर्व संचालक विश्वस्ताच्या भावनेने पारदर्शक व्यवहार करत आहेत व सेवकही सभासदांना विनम्र सेवा देवून संस्थेच्या वाढीसाठीच सतत काम करीत आहेत. यामुळे स्थापनेपासून संस्थेला सर्वोच्च ऑडीट वर्ग अ मिळत आहे यापुढेही त्यांनी असेच काम करुन संस्थेचा नावलौकीक हा महाराष्टातच नाही तर पूर्ण देशात वाढवावा असे त्यांनी यावेळी सांगीतले व पतसंस्था वाढीस मोलाचे सहकार्य करणा-या संचालक सभासद ठेवीदार व सेवक वर्गाचे आभार मानले.
डॉ. संभाजी सांळुखे यांचा सत्कार संस्थापक चेअरमन डॉ. रविंद्र भोसले यांचे हस्ते व डॉ. मोहन तांबे यांचा सत्कार व्हा. चेअरमन डॉ. कांत फडतरे यांचे हस्ते करण्यात आला तसेच दिपावलीीनिमित्त सर्व सेवकांना दिपावली भेटीचे वितरण प्रमुख पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी डॉ. संभाजी साळुंखे व डॉ. मोहन तांबे म्हणाले की, संस्थेने केलेली प्रगती हि कौतुकास्पद असून तिच्या भक्कम आर्थिक स्थीतीमुळेच ठेवीदार संस्थेकडे बिनधास्त ठेवी ठेवीत आहेत. संस्था सामाजिक बांधीलकीचे जाणीवेतून विविध कार्यकम राबवित आहे असेच सामाजिक कार्य तिने भविष्यातही चालू ठेवावेत अशी अपेक्षा व्यक्त करुन दोघांनीही सत्काराबदद्ल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच डॉ. मोहन तांबे यांनी धन्वंतरी जयंतीनिमित्त ‘धन्वंतरी देवतेचे पुजन व उत्पत्ती बाबत मोलाची माहीती व मार्गदर्शन केले
संस्थेचे व्हा. चेअरमन डॉ. कांत फडतरे याप्रसंगी बोलताना म्हणाले, पतसंस्था ही सहकारक्षेत्रात काम करीत असली तरी सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून तिचा शासनाच्या पल्स पोलिओ, रक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान, कुष्ठरोग निवारण इ. कार्यक्रमात सतत सहभाग असतो. संस्थेने सभासदांचेकरीता मोफत वाचनालय सुरु केले असून सदर वाचनालयात विविध प्रकारचे ग्रंथ उपलब्ध आहेत याचा सर्व सभासदांनी लाभ घ्यावा असे आवाहन करून सर्व उपस्थितांचे आभार मानले. तसेच सेवकांचे पगारवाढीबाबत लवकरच निर्णय घेवून सेवकांचे आर्थिक आरोग्यही उत्तम होईल याबाबत आश्वस्त केले. तसेच भविष्यात सर्वाच्या सहकार्याने आपली संस्था शासनाचा सहकार महर्षी हा सर्वोच्च पुरस्कार निश्चित मिळवेल अशी खात्री दिली.याप्रसंगी संस्थेचे सभासद व ठेवीदार यांनी संस्थेच्या कामकाजाबदद्ल व मिळत असलेल्या ग्राहकसेवेबदद्ल समाधान व्यक्त केले व भावी उपकमासाठी शुभेच्छा दिल्या.प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. श्रीहरी डिंगणे यांनी पाहुण्यांचा परीचय करून दिला व कार्यकमाचे सुत्रसंचालन सह. उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौ. अलका मुरूमकर यांनी केले.
सदर प्रसंगी संचालक डॉ. शिरीष भोईटे, डॉ. अरविंद काळे, डॉ. शकील अत्तार, डॉ. हेमंत शिंदे, डॉ. अभिजीत भोसले, डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. श्रीरंग डोईफोडे, डॉ. सौ. सारीका मस्कर, डॉ. सौ. हर्षला बाबर, डॉ. जयदीप चव्हाण, डॉ. नारायण तांबे, अॅड. सुर्यकांत देशमुख, डॉ. सुनिल कोडगुले, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय पवार, सभासद व सेवक वर्ग उपस्थित होते.




