महाबळेश्वर तालुक्यातील कासरूड-हातलोट गावांचा संपर्क तुटला, प्रशासनाकडून तात्काळ लक्ष देण्याची मागणी
कासरूड: महाबळेश्वर तालुक्यातील कासरूड आणि हातलोट ही दोन गावे गेल्या काही दिवसांपासून दळण वळणांच्या सुविधांपासुन पूर्णपणे वेगळी झाली आहेत. कारण कासरूड येथील जुना पूल तोडून नवीन पूल बांधण्याचे काम सुरू आहे, परंतु कामाची गती अतिशय मंद आहे. पावसाळा सुरू झाला तरीही अद्याप पूल पूर्ण झालेला नाही आणि तयार केलेल्या पर्यायी मार्गाचा पहिल्याच पावसात भराव वाहुन गेल्याने पाण्याचे पाईप उघङे पङले आहेत.
यामुळे दोन्ही गावांची रहदारी पूर्णपणे बंद झाली आहे.
यामुळे गावातील लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रुग्णांना दवाखान्यात कसे घेउन जायचे, विद्यार्थ्यांना शाळेत कसे जायचे ?आणि आवश्यक वस्तूंचा पुरवठा कसा करायचा यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत.
समाज प्रबोधन मंडळाचे अध्यक्ष श्री प्रकाश कांबळे,सचिव सचिन कांबळे यांनी प्रशासनाला तात्काळ लक्ष देण्याची आणि पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
