खेड ग्रामपंचायतीने बसवलेल्या आर. ओ. यंत्रणेच्या चौकशीची रिपाई ची मागणी
सातारा दि: सातारा शहरानजीक असलेल्या खेड ग्रामपंचायतीने नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा व्हावा. यासाठी खेड ग्रामपंचायत मध्ये बसवण्यात आलेल्या आर ओ यंत्रणेची चौकशी करा अशी मागणी रिपाई कार्याध्यक्ष राजेंद्र ओव्हाळ यांनी केली आहे.
सातारा शहरनजिक असलेल्या खेड ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये सत्ता कुणाची असली तरी भ्रष्टाचाराचा आरोप कधी चुकलेला नाही. मोठ्या प्रमाणात वाढत्या नागरिकीकरणामुळे भ्रष्टाचाराचे कुराण म्हणून खेड ग्रामपंचायतकडे पाहिले जाते. कधी आवास योजनेत तर कधी अंतर्गत गटारामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या ठिकाणी सातत्याने आरोप प्रत्यारोप होत असतात. त्याला खतपाणी घालण्याचे काम ग्रामपंचायत मार्फत होत आहे. आता शुद्ध पाणी पिण्यास मिळत नसले तरी याबाबत साधी चौकशी करण्याचे सौजन्य खेड ग्रामपंचायत हद्दीत राहणाऱ्या लोकप्रतिनिधींना करता येत नाही. हेच दुर्दैव आहे.
खेड ग्रामपंचायत हद्दीत पाच ठिकाणी आर. ओ. पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसवून कार्यान्वित केली होती. काही दिवस शुद्ध पाणी पुरवठा झाल्यानंतर सुमारे पंधरा लाख रुपये खर्च करून आर. ओ. (पाणी शुद्धीकरण करणारी )यंत्रणा अचानकपणाने बंद पडली होती. त्यामुळे ग्रामविकास मंत्र्यांच्या जिल्ह्यात आर . ओ यंत्रणा बसूनही स्वच्छ पाणी पुरवठा खंडित झाला आहे. याबाबत चौकशी करून कारवाई करावी. यासाठी खेड ग्रामपंचायत मधील रहिवाशांनी सातारा जिल्हा परिषद, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) व सातारा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन दिनांक ७ जुलै २०२६ रोजी लेखी तक्रार दिली होती.
या लेखी तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे अखेर रिपाईचे कार्याध्यक्ष श्री राजेश वसंत ओव्हाळ यांनी स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट २०२६ रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिल्याने खळबळ माजली आहे. दरम्यान, खेड ग्रामपंचायत मध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याने अनेक नागरिक आजारी पडत आहेत. याबाबत केलेल्या तक्रारीची जिल्हा व तालुका प्रशासन तसेच खेड ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देत नाही. त्यामुळेच कार्यकर्त्यांना आत्मदहन करण्याचा इशारा द्यावा लागत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनाच्या प्रति संबंधित विभागाला देण्यात आलेले आहेत. दरम्यान, खेड ग्रामपंचायत अंतर्गत
जल जीवन मिशन राष्ट्रीय योजनेअंतर्गत खेड गावातील प्रत्येक घराला ‘नळाने शुद्ध पाणी’ पुरवण्याचे काम केले जाते.विहिरी किंवा विंधन विहिरीच्या पाण्याचे टीसीएल ( ब्लिचिंग पावडर) वापरून शुद्धीकरण केले जाते. तसेच मोठ्या गावांमध्ये ‘प्रेशर फिल्टर’ किंवा ‘आरओ ( प्लांट’ देखील बसवले जातात.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जलसुरक्षकाद्वारे वर्षातून ठराविक वेळा पाण्याची जैविक आणि रासायनिक तपासणी सातारा येथील प्रयोगशाळेत केली जाते. असा खेड ग्रामपंचायतीने दावा केलेला आहे.





