दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या गोडोली शाखेचा बुधवारी 22 वा वर्धापन दिन
सातारा : दि.3 (प्रतिनिधी) दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या गोडोली विलासपूर शाखेचा 22 वा वर्धापन दिन बुधवार दिनांक 5 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी10.00 वाजता शॉप नं.3, गजानन गार्डन, विलासपूर गोडोली सातारा येथे संपन्न होणार आहे.
सदर वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या या गोडोली -विलासपूर शाखेने श्री सत्यनारायणाची पूजा आयोजित केली आहे. तरी संस्थेचे सभासद ठेवीदार, कर्जदार ,हितचिंतकांनी तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले यांनी केले आहे.
दीपलक्ष्मी पतसंस्था सहकारात गेली 28 वर्षे अविरत काम करत असून खातेदारांना आर्थिक सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहे. तसेच खातेदारांच्या पाल्यांसाठी सुद्धा करिअर गायडन्स करून त्यांच्या भविष्याला दिशा देण्याचा प्रयत्न करत आहे.
अशा या नावारूपास आलेल्या संस्थेच्या गोडोली- विलासपूर शाखेचा प्रगतीचा आढावा घेताना संस्थापक- चेअरमन शिरीष चिटणीस म्हणाले या शाखेने 6 कोटी 25 लाखाच्या ठेवी समाजातून गोळा केल्या असून 4 कोटी 25 लाख रुपयचे समाजातील व्यापारी , व्यावसायिक, नोकरदार तसेच सुशिक्षित बेरोजगारांना
कर्ज वाटप केले आहे व तरलते पोटी 2 कोटी रुपयाच्या ठेवी शहरातील विविध बँकांमध्ये ठेवल्या आहेत.अशा या संस्थेच्या एकूण ठेवी 40 कोटी झाल्या आहेत.
संस्था समाजात आर्थिक कार्य करत असताना डिजिटल अर्थव्यवस्थेकडे वळत आहे. यामध्ये संस्था आरटीजीएस, एनईएफटी, यूपीआय सारख्या सुविधा संस्थेच्या खातेदारांना देत असून त्यांचा अमूल्य वेळ वाचवत आहे. संस्थेच्या या गोडोली- विलासपूर शाखेने आर्थिक व्यवहाराची व सामाजिक बांधिलकीची यशस्वी 22 पूर्ण केली असून शाखा 23 व्या वर्षात पदार्पण करत आहे.




