सरलष्करबहाद्दर श्रीमंत राजसिंहराजे आप्पासाहेब निंबाळकर तथा श्रीमंत बंटीराजे खर्डेकर यांचे निधन
आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सासरे व मामा तसेच श्रीमंत छ.वेदांतीकाराजे वाहिनीसाहेब यांचे वडील सरलष्करबहाद्दर श्रीमंत राजसिंहराजे आप्पासाहेब निंबाळकर तथा श्रीमंत बंटीराजे खर्डेकर यांचे दुःखद निधन झाले.
त्यांचा अंत्यविधी उद्या दहा वाजता फलटण येथे होणार असून ७ वाजता फलटण येथील बंगल्यावर लक्ष्मी नगर निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
प्रसिद्ध उद्योगपती श्रीमंत बंटीराजे खर्डेकर यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले ते कै. श्रीमंत दादाराजे खर्डेकर यांचे बंधू, साताऱ्याचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे ते सासरे व मामा तसेच श्रीमंत छ. वेदांतीकाराजे वाहिनीसाहेब यांचे वडील होत. त्यांचा अंत्यविधी फलटण येथील साईराजा कंपनी येथे सकाळी 10 वाजता होईल.
