दत्तात्रय कळंबे महाराज पतसंस्थेने कळंबे महाराजांचा विचार जपला : वसंतराव मांनकुमरे ; दत्तात्रय कळंबे महाराज पतसंस्थेच्या भोसे शाखेचे उद्घाटन
पाचगणी : अलीकडच्या काळात सहकार क्षेत्रात प्रचंड अशी जीवघेणी स्पर्धा आणि आव्हाने निर्माण झाली आहेत. अध्यात्मिक आणि सहकाराचा महामेरू समजल्या जाणाऱ्या दत्तात्रय कळंबे महाराज यांचा आशीर्वाद लाभलेल्या जावली तालुक्यातील कै. दत्तात्रय कळंबे महाराज नागरी सहकारी पतसंस्थेने त्यांचे विचार, संस्कार आणि संस्कृती जपली असल्याने संस्थेला उज्वल भवितव्य असल्याचे गौरवोद्गार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी काढले.
दापवडी येथील दत्तात्रय कळंबे महाराज नागरी सहकारी पतसंस्थेला जिल्हा कार्यक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला असून भोसे ( ता.महाबळेश्वर ) शाखेच्या उद्घाटन प्रसंगी श्री मानकुमरे बोलत होते. यावेळी माजी आमदार सदाभाऊ सपकाळ, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रवीण भिलारे, जावळी बँकेचे संचालक अजित कळंबे, सहकार बोर्डाचे अध्यक्ष महादेव दुधाणे , भोसेचे सरपंच अरुण गोळे, कृषितज्ज्ञ किसंनशेठ भिलारे, प्रतापगड साखर कारखान्याचे संचालक गणपत पार्टे, शशिकांत भिलारे, गणेश गोळे, महाबळेश्वरचे सहकार अधिकारी सुहास आंब्राळे, उद्योजक हरीश गोळे, भिलारचे सरपंच शिवाजीराव भिलारे, रमेश चोरमले, दत्ता बावळेकर, राम गोळे, कुसुम गोळे, दिलीप आंब्राळे, सातारा बँकेचे माजी उपव्यास्थपक संजय बेलोशे, संजय मोरे, नारायण जाधव, काटवली सोसायटीचे चेअरमन शंकर पवार,अँड. तुकाराम बेलोशे, उमेश बेलोशे, वसंतराव बेलोशे, संस्थेचे चेअरमन रविकांत बेलोशे, व्हा. चेअरमन हरिश्चंद्र गावडे, संचालक तुकाराम घाडगे, बाबुराव रांजणे, विजय रांजणे, प्रकाश रांजणे, रामचंद्र चिकणे, मधुकर पवार, भीमराव खरात, रामचंद्र रांजणे बुवा, साहेबराव गोळे, दिनकर बेलोशे, प्रकाश बेलोशे, दत्तात्रय बेलोशे, भारत रांजणे, तानाजी रांजणे, दत्तात्रय रांजणे, संपत रांजणे, संस्थेचे सचिव अनिल रांजणे तसेच संस्थेचे सभासद उपस्थित होते.
कुठल्याही संस्थेच्या भरभराटीसाठी संचालकंची जबाबदारी महत्वाची असते. कर्मचाऱ्यांनी ग्राहकाना आपुलकीची सेवा दिल्याशिवाय संस्थेचा उत्कर्ष होत नाही याची जाणीव सर्वांनी ठेवल्यास संस्थेची प्रगती निश्चित आहे याचं मूर्तीमंत उदाहरण ही कळंबे महाराज संस्था असल्याचे यावेळी माजी आमदार सदाभाऊ सपकाळ यांनी सांगितले.
राजेंद्र शेठ राजपुरे म्हणाले महाबळेश्वर तालुका हा पर्यटन दृष्ट्या सक्षम आहे. भोसे हे गाव सुधा सध्या उद्योग व्यवसायाच्या क्रांतीत आहे. त्यामुळे येथे चलंनवलनासाठी सहकारी संस्थेची आवश्यकता आहे ती कसर भरून काढण्याचे काम दत्तात्रय कळंबे महाराज पतसंस्थेने केले आहे. संस्थेला आमचे सर्वतोपरी सहकार्य राहणार असल्याचे सांगितले.
यावेळी संस्थेचे लेखापरीक्षक गणेश पोफळे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. सूत्रसंचालन गणेश पोफळे यांनी केले तर बाबुराव रांजणे यांनी आभार मानले.
दत्तात्रय कळंबे महाराज पतसंस्था जावळी तालुक्यातील अव्वल संस्था असून आता महाबळेश्वर तालुक्यात सुद्धा सहकाराची मुहूर्तमेढ रोवली आहे. त्यामुळे कळंबे महाराजांच्या विचाराने चाललेली ही संस्था महाबळेश्वर तालुक्यात ही चांगल नावलौकिक मिळवेल असा. विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.
पांचगणी : फित कापून संस्थेचे उद्घाटन करताना सदाभाऊ सपकाळ, शेजारी राजेंद्र शेठ राजपुरे , वसंतराव मानकुमरे, रविकांत बेलोशे व इतर (छाया : विश्वनाथ ओंबळे)
