Home » Uncategorized » सायबर गुन्ह्यांना आधुनिक तंत्रज्ञानाने उत्तर द्यावे लागेल’-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सायबर गुन्ह्यांना आधुनिक तंत्रज्ञानाने उत्तर द्यावे लागेल’-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

सायबर गुन्ह्यांना आधुनिक तंत्रज्ञानाने उत्तर द्यावे लागेल’-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे, ‘खासदार औद्योगिक महोत्सव : अ‍ॅडव्हांटेज विदर्भ २०२५’ कार्यक्रमात, ‘सायबर हॅक २०२५ स्पर्धा – बक्षीस वितरण’ पार पडले. यामध्ये प्रथम बक्षीस, नागपूरच्या ‘रामदेव बाबा कॉलेज संघ’ यांना ‘₹१ लाख रोख व चषक’ या स्वरूपात प्रदान करण्यात आला. द्वितीय बक्षीस ‘इन्फोसिस कॉर्पोरेट सायबर डिफेंडर्स संघ’ यांना ‘₹७५,००० रोख व सन्मानचिन्ह’, तसेच तृतीय पारितोषिक ‘जी.एच. रायसोनी कॉलेज कोड क्रॅकर्स संघ’, नागपूर यांना ‘₹५०,००० रोख व सन्मानचिन्ह’ स्वरूपात देण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधितही केले.

तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सातत्याने नवनवे संशोधन सुरु आहेत. प्रत्येक माणसाच्या जीवनात, तसेच समाजजीवनात येत असलेल्या विविध अडचणी, या केवळ अडचणी नसून, या संधी देखील आहेत. या संधी व्यवसाय देखील निर्माण करतात. सध्या देशात व राज्यात विविध प्रकारचे सायबर फसवणूक गुन्हे सुरू आहेत. भविष्यात रस्त्यांवरील गुन्हे कमी होऊन, सायबर गुन्हे वाढणार आहे. याला सक्षमरित्या तोंड देण्यासाठी देशात सायबर प्लॅटफॉर्म तयार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असून, या प्लॅटफॉर्ममुळे सामान्य जनतेचे शेकडो कोटी रुपये वाचले असल्याचे, मुख्यमंत्री श्री. फडणवीस याप्रसंगी म्हणाले.सायबर गुन्हेगारीला आळा घालायचा असल्यास, त्याला त्याच पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, सक्षम उत्तर द्यावे लागेल.

या स्पर्धेतून अनेक चांगल्या कल्पक गोष्टी पुढे आल्या आहेत, विजेत्यानी त्यांच्या मांडलेल्या उपाययोजनांचा, ‘फंड ऑफ फंड’ या राज्य शासनाच्या स्टार्टअप उपक्रमाचा फायदा घेत, त्यांच्या उपाययोजनांचे व्यवसायात रूपांतर करावे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. स्टार्टअप इंडिया कार्यक्रमात देशात महाराष्ट्र आघाडीवर असून, महाराष्ट्र हे स्टार्टअप हब झाले आहे. नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्न करत असल्याचे, मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर शहर पोलीस दल व संबंधित संस्था, तसेच स्पर्धेत सहभागी संघ व विजेत्या संघाचेही अभिनंदन केले.यावेळी, सायबर सुरक्षा तज्ञ अमित दुबे, नागपूर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

छत्रपती शिवाजी कॉलेजच्या उप प्राचार्यपदी प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांची नियुक्ती

Post Views: 13 छत्रपती शिवाजी कॉलेजच्या उप प्राचार्यपदी प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांची नियुक्ती सातारा: येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय

Live Cricket