कराड येथे ग्राहक मंचाची मीटिंग संपन्न.
कराड : ग्राहक तक्रार निवारण मंच कराड तालुका यांची नुकतीच बैठक कराड येथील कराड पाटण प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभागृहामध्ये संपन्न झाली. या बैठकीमध्ये कराड तालुका व सातारा जिल्ह्यातील अनेक सर्वसामान्यांच्या प्रश्नांवरती चर्चा करण्यात आली. ग्राहक म्हणून बऱ्याच सर्वसामान्य लोकांना याची माहिती नाही म्हणून या संघटनेच्या वतीने प्रचार प्रसार करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. तसेच याबाबत कराड तालुका तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली प्रति महिना बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले.
या बैठकीस मार्गदर्शन करण्यासाठी सातारा जिल्हा अध्यक्ष सुनिता राजे घाडगे, जिल्हा संघटक रंगराव जाधव यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
या बैठकीस कराड तालुका अध्यक्ष कॉम्रेड अधिकराव पाटील,आलेकर गुरुजी कराड सचिव ऍड संपकाळ माणिकराव गायकवाड, ऍड भीमराव शिंदे, दिनकरराव निकम गुरुजी, विद्याधर गायकवाड यांच्यासह तालुका कार्यकारणी सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते