विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्व परिपूर्ण होण्यासाठी वकृत्व कला जोपासावी – मोटार वाहन निरीक्षक चैतन्य कणसे
कराड – विद्यार्थ्यांचे परिपूर्ण व्यक्तीमत्व होण्यासाठी वकृत्व कला अंगी असणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन कराड आर टी ओ मोटार वहान निरिक्षक चैतन्य कणसे यांनी केले.गोटे-मुंढे ता कराड येथील यशवंत शिक्षण संस्थेचे प्रितिसंगम विद्यालयात यशवंत सांस्कृतिक व्यासपीठ च्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व व संत तुकाराम महाराज गाथा पाठांतर स्पर्धा चे उद्घाटन वेळी ते बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्था सचिव डी ए पाटील होते. प्रमुख उपस्थितीत कराड पंचायत समिती चे शिक्षण विस्तार अधिकारी नितीन जगताप, निवास पवार, पद्धमिनी उद्योग समुहाचे सचिन जगताप, मुख्याध्यापक ए .आर. मोरे,के .आर .साठे,एम .बी .पानवळ,ए . एल. पाटील व दिपक पवार हे होते.
मोटर वाहन निरीक्षक चैतन्य कणसे म्हणाले वक्तृत्व तोच करतो जो लिहितो, जो लिहितो तोच निरीक्षण करतो व जो निरीक्षण जो करतो त्याचा सर्वत्र संचार असतो.यामुळे वक्तृत्व बहरते. वक्तृत्व कला आपल्या अंगी बाळगणे गरजेचे आहे.अशा स्पर्धा मुळे शालेय स्तरावर विद्यार्थी चे व्यक्ती महत्व बहरते. कोण लेखक, अधिकारी , शेतकरी,नेता चांगला होतील ,शालेय जीवन आनंदमय जगेल तोच खरा जीवनात यशस्वी होईल.सद्या रस्ता सुरक्षा सप्ताह मोहीम सुरू आहे.यामध्ये सहभागी व्हा वाहन चालवताना काळजी घ्या नियमांच पालन करा.नेहमी उजव्या बाजूने चालावे कारण समोरून येणार वाहन दिसते होणार अपघात टळेल.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी नितीन जगताप म्हणाले हा राज्यस्तरीय स्पर्धा गेली सत्तावीस वर्षापासूनअखंडपणे चालू असलेला हा ज्ञान यज्ञ समाजाला दिशा दर्शक ठरेल. सन्यासी योध्दा स्वामी विवेकानंद व महाराष्ट्र माऊली जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त या राज्यस्तरीय वक्तृत्व व गाथा पाठांतर स्पर्धा पार पडता आहेत.भारतीय संस्कृती ही ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज गाथेवर चालते.वारकरी संप्रदायाचे प्रचार आणि प्रसार या स्पर्धेत तून होत आहे.
शिक्षण विस्तार अधिकारी निवास पवार म्हणाले या राज्यस्तरीय उपक्रम स्पर्धा स्वर्गीय ए.व्ही पाटील अण्णा यांनी सुरू करुन विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या अष्टपैलू गुणांना वाव दिला आहे हे संस्थेचे काम कौतुकास्पद आहे.सर्व सामाजिक विषय आहेत.
संस्थेचे सचिव डी. ए. पाटील म्हणाले विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी संस्थाच्या सर्व शाखांमध्ये विविध सहशालेय उपक्रम राबविले जातात.आज या शिक्षण संस्थेतून शिकलेले विद्यार्थी शासकीय सेवेत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल लोकरे, स्वागत मुख्याध्यापक दिपक पवार यांनी, सुत्रसंचलन निवास पोळ व आभार ए. एल. पाटील यांनी मानले.या राज्य स्तरीय विविध स्पर्धा मध्ये जिल्ह्यातील सुमारे दिडशे विद्यार्थी नी सहभाग घेतला होता.
