रोहोट परिमंडळात वन्यजीव रक्षणासाठी सातारा वन विभागाचे सतत प्रयत्न
सातारा प्रतिनिधी -सातारा तालुक्यातील रोहोट परिमंडळात वन्यजीव संवर्धन व संरक्षणासाठी वन विभागाकडून प्रभावी काम सुरू आहे. वनपाल व वनरक्षक वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी सातत्याने प्रयत्नशील असून, कुठेही वन्यप्राणी जखमी झाल्याची किंवा गावात आल्याची माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी पोहोचत आहेत.
सातारा तालुख्यातील रोहोट परिमंडळ मध्ये वनपाल व वनरक्षक वन्यजीव संवर्धनासाठी व वन्यप्राणी रक्षणासाठी भरपूर प्रयत्न करत आहेत. एखादे ठिकाणी वन्यप्राणी जखमी झाला किंवा त्या गावात वन्य प्राणी आल्याचे समजल्यास तात्काळ वनपाल वनरक्षक जागेवर जात आहेत.वन्य प्राण्यांकडून पशु आणि झाल्यास तात्काळ जागेवर जाऊन पंचनामा व पंचनामा करून वरिष्ठ कार्यालयास कागद पत्र तालुका ऑफिसला तात्काळ सादर केली जात आहेत.
वन्य जीवाचे प्राण वाचवण्यासाठी रोहोट परिमंडळातील वनपाल वनरक्षक आटोकाट प्रयत्न करत आहेत रोहोट परिमंडळात वन्यप्राणी यांच्या विषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे ग्रामस्थांना अन्नसाखळी विषयी जनजागृती केली जात आहे त्यामुळे एखाद्या गावात वन्य प्राणी दिसल्यास तात्काळ गावकरी वनपाल यांना संपर्क करत आहेत मानव वन्यजीव संघर्ष कमी होताना दिसत आहे ज्या भागात बिबट्यांचा वावर जास्त आहे.त्या ठिकाणी रात्रगस्त केली जात असून लोकांच्या मीटिंग घेऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे.
ग्रामस्थांच्या मीटिंग घेऊन नागरिकांनी कशी काळजी घ्यावी याबाबत माहिती दिली जात आहे त्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष रोहोट परिमंडळामध्ये एकूण 19 गावे असून वनपाल राजाराम काशीद ग्रामस्थांच्या मीटिंग घेऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती करत आहेत त्यांच्या या कार्यामुळे वन्यप्राणी सुरक्षित आहेत स्थानिक नागरिकांकडून त्यांना मदत होत आहे. त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे वनपाल राजाराम काशीद हे वेळेचा विचार न करता आदर्श लोकसेवकाप्रमाणे काम करत आहेत.
वन्यजीव व पर्यावरणाबद्दल मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांच्या मीटिंगमध्ये ते जनजागृती करत आहेत पशु आणि प्रकरणात वेळेचा विचार न करता जागेवर जाऊन तात्काळ पंचनामे करत आहेत झुगंटी येथून पंचनामा करून येत असताना मोजे पाली येथे त्यांच्या गाडीचा अपघात होऊन त्यांच्या तोंडाला व पायाला व हाताला मार लागला होता. परंतु रजा न घेता त्यांनी त्यांचे काम चालूच ठेवले आहे यावरून त्यांचे वन्यजीव व पर्यावरण विषयीची आत्मयता समजून येते.
अमोल सातपुते उपवनसंरक्षक, प्रदीप रोदंळ सहाय्यक वनसंरक्षक वनिकरण संदीप जोपळे वनक्षेत्रपाल सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली रोहोट परिमंडळातील वनरक्षक यांना सोबत घेऊन राजाराम काशीद वन्यजीवांविषयी व पर्यावरणाविषयी व वनसंरक्षणाविषयी मोठ्या प्रमाणात रोहोट परिमंडळात जनजागृती करत आहेत त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ वन विभागात सहकार्य करत आहेत.
वन्यप्राणी यांचे कडून पशुहानी झालेसं तात्काळ जागेवर जाऊन पंचनामा, जबाब ई कागद पत्र तयार केली जात आहेत मानव व वन्यजीव संघर्ष कमी करणे हाच मुख्य हेतू आहे.
-राजाराम काशीद वनपाल रोहोट




