संस्कृती, सर्जनशीलता आणि सातत्याचा संगम — सातारा मीडिया सेवनचा चौथा दिवाळी अंक-सागर धनावडे
सातारा मीडिया सेवनचा दिवाळी अंक युवा नेतृत्व सागर धनावडे यांच्या हस्ते प्रकाशित
सातारा : सागर धनावडे यांच्या सातारा येथील कार्यलयात “सातारा मीडिया सेवन” च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन उत्साहात पार पडले. सातारा मीडिया सेवन गेली चार वर्षांहून अधिक काळ सातत्याने दिवाळी अंक प्रकाशित करत असून, मराठी मनाचा ठाव घेणारी संस्कृती जपण्याचे कार्य करत आहे, असे गौरवोद्गार युवा नेतृत्व सागर धनावडे यांनी काढले.
जेष्ठ विचारवंत सहकार तज्ञ शिरीष चिटणीस, प्राध्यापक सूर्यकांत अडाते, लेखक श्रीरंग काटेकर, यशवंत गायकवाड, डॉक्टर आबासाहेब सर्वदे, भूषण मुळे, राजेंद्र चौधरी, यशेंद्र शिरसागर, डॉक्टर अविनाश भोंडवे, ह भ प संजय बेलोशे, लेखक मुकुंद शिंदे या नामवंत लेखकांनी सातारा मीडिया सेवन च्या चौथ्या अंकास शब्दांचे कोंदण दिले आहे.
या प्रकाशन सोहळ्यास तुषार धनावडे, प्रविण धनावडे, विक्रांत धनावडे, रूपेश शेलार, शैलेश शेलार आणि सिद्धार्थ कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

सातारा न्यूज मीडिया सेवन चा दिवाळी अंक नेहमीप्रमाणेच तजेला आणि वाचनीय आहे.
माननीय श्री. शिरीष चिटणीस

दिवाळी अंकाची प्रथा सातत्याने पुढे नेत जाण्याची सातारा न्यूज मीडिया सेव्हन ची धडपड वाखाण्यासारखी आहे.
माननीय श्रीकांत देशमुख (लेखक कवी )
नेहमीप्रमाणेच सातारा न्यूज मीडिया सेवन चा दिवाळी अंक सुंदर आणि वाचनीय असा आहे.
मा.विकास शिंदे. उपजिल्हाप्रमुख शिवसेना





