विद्यार्थी गुणवत्ता वाढवण्यासाठी शाळा स्तरावर सहशालेय उपक्रम राबवावे – निवास पवार
तांबवे – विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शाळा स्तरावर सहशालेय उपक्रम राबवावे असे प्रतिपादन शिक्षण विस्तार अधिकारी निवास पवार यांनी केले.
शेरे (शेणोलीस्टेशन) ता. कराड येथील कृष्णा विद्यालयात आयोजित केलेल्या वडगांव हवेली बीटातील सर्व मुख्याध्यापक सहविचार सभा वेळी ते बोलत होते.यावेळी केंद्र समन्वयक दादासाहेब शेडगे,प्रभाकर ठोंबरे, सुभाष कुंभार मुख्याध्यापक एस. आर .कांबिरे यांची प्रमुख उपस्थिती होती. निवास पवार म्हणाले शासकीय स्तरावर वरील सर्व योजना शाळा स्तरावर राबवून विद्यार्थ्यांना त्या योजनाचा लाभ द्यावा . शिष्यवृत्ती ,एन एम एन एस या सारख्या शासकीय परीक्षा मध्ये विद्यार्थी सहभाग वाढून गुणवत्ता वाढीसाठी शाळांतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे.नव भारत साक्षरता कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी.पंतप्रधान पोषण योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना द्यावा. वडगांव हवेली बिटातील सर्व शाळांमध्ये गुणवत्ता झाली पाहिजे. यावेळी प्रास्ताविक सुभाष कुंभार यांनी, स्वागत मुख्याध्यापक एस आर कांबिरे व सुत्रसंचलन जाधव व आभार दिपक पवार यांनी मानले.
