हर घर दस्तक मोहीमेत नागरिकांनी सहभाग घ्यावा
सातारा : भारतातील मौल्यवान हस्तलिखित वारशाचे संवर्धन करण्यासाठी केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालयाने ज्ञानभारतम् (Gyan Bharatam) हा राष्ट्रव्यापी प्रकल्प सुरू केला आहे. या मोहिमेत नागरिकांच्या घरात, खाजगी संग्रहात किया संस्थांकडे असलेल्या जुन्या पोथ्या, ग्रंथ, ताडपत्रे यांची माहिती मिळवण्यासाठी हर घर दस्तक मोहीम राबवली जात आहे.या मोहिमेची अंतिम मुदत 15 जून 2026 आहे. तरी या मोहिमेत जिल्ह्यातील नागरिकांचा सक्रिय सहभाग, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी केले आहे.




