छत्रपती शिवाजी कॉलेज एन सी सी चे तीन कॅडेट कंद्रिया सशत्र दलात निवड
सातारा प्रतिनिधी -छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथील राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने युवक-युवतींना मिलिटरीचे मूलभूत प्रशिक्षण देऊन तरुणांना देश सेवेसाठी तयार केले जाते. 2024 मध्ये स्टाफ सिलेकशन कमिशन कडून घेण्यात आलेल्या केंद्रीय सशस्त्र दल निवड परीक्षेमध्ये कॅडेट विशाल काळंगे व सार्जंट सोनाली कदम यांची CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात आणि कॅडेट प्रमोद काटकर यांची ITBP इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्स मध्ये अभिनंदनिय निवड झाली.
छत्रपती शिवाजी कॉलेजचेआजही एन.सी.सी ऑफिसर मेजर पी. एस. गायकवाड साहेब यांच्या हस्ते यशस्वी छात्र सैनिकांचा सत्कार करण्यात आला. यशस्वी कडेट्सना NCC बटालियनचे कमांडर कर्नल राजमणार साहेब व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोरे साहेब व लेफ्टनंट डॉ. केशव पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
