यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये सी.ई.टी. चे परीक्षा केंद्र आणि मार्गदर्शन वर्ग
यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये इंजीनियरिंग आणि फार्मसी प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या एमएचटी-सीईटी परीक्षेचे अधिकृत परीक्षा केंद्र म्हणून महाराष्ट्र शासनाकडून मान्यता प्राप्त झाली आहे. अशी माहिती यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे कुलसचिव श्री गणेश सुरवसे यांनी दिली. सातारा जिल्ह्यातील हे सर्वात जास्त विद्यार्थी संख्या असलेले परीक्षा केंद्र आहे. आपल्या पाल्यास परीक्षा केंद्रावर घेऊन येणाऱ्या पालकांसाठी फार्मसी आणि इंजीनियरिंग प्रवेश प्रक्रियेबद्दल माहिती मिळावी यासाठी परीक्षेच्या कालावधीमध्ये दररोज सकाळी आणि दुपारच्या सत्रामध्ये पालकांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान वर्गांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
बहुदा ग्रामीण भागातील पालकांना आपल्या पाल्याच्या प्रवेशासंदर्भात नेहमीच चिंता सतावत असते. पालकांच्या मनामधील शंकांचे निरसन करण्यासाठी आणि प्रवेश प्रक्रियेमध्ये असणारे टप्पे आणि अडचणी समजून घेण्यासाठी पालकांना अशा प्रकारचे मार्गदर्शन वर्ग महत्त्वाचे ठरत असतात. यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मेकट्रोनिक्स, सायबर सिक्युरिटी, रोबोटिक्स असे प्रगत आणि अध्यायावत अभ्यासक्रम उपलब्ध झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अशा नवनवीन अभ्यासक्रमानविषयी प्रचंड कुतूहल असते. पालकांनी अशा प्रकारच्या मार्गदर्शन वर्गामध्ये उपस्थित रहावे असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.
