Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » सीए दिलीप गुरव यांचा देशातील सहकारी बँकांमधील सर्वोत्तम प्रभावशाली नेतृत्व म्हणून गौरव

सीए दिलीप गुरव यांचा देशातील सहकारी बँकांमधील सर्वोत्तम प्रभावशाली नेतृत्व म्हणून गौरव

सीए दिलीप गुरव यांचा देशातील सहकारी बँकांमधील सर्वोत्तम प्रभावशाली नेतृत्व म्हणून गौरव

कराड -इंडियन स्टार्टअप टाईम्स यांच्यातर्फे (नवीन युगातील प्रभावी डिजीटल न्यूज) दिला जाणारा देशपातळीवर मानाचा समजला जाणारा सहकारी बँकांमधील सर्वात प्रभावशाली नेतृत्वाला पुरस्कार दिला जातो. अर्बन कुटुंबाचे सल्लागार सीए दिलीप गुरव यांना त्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यकालातील केलेल्या विशेष कार्यामुळे सर्वोत्तम प्रभावशाली नेतृत्व हा गौरव प्राप्त झाला आहे. अर्बन कुटुंबियांसाठी हा अतिशय अभिमानाचा क्षण आहे. सीए दिलीप गुरव यांची भूमिका सर्वसमावेशक असून तळागाळातील लोकांना बँकिंग सेवा, कर्जाची उपलब्धता आणि अचूक व तत्पर ग्राहक सेवा तसेच आर्थिक साक्षरतेसाठी त्यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. कराड अर्बन बँक एक विश्वासार्ह आणि सकल जनांचा आर्थिक आधारवड ठरला पाहिजे हे त्यांनी मनापासून केलेल्या नेतृत्वामधून सिद्ध केले आहे. अशा शब्दात इंडियन स्टार्टअप टाईम्स ने सीए दिलीप गुरव यांच्याविषयी गौरोद्वार काढले आहेत. सन्मान करताना असा उल्लेख केला आहे की, प्रामाणिकपणा आणि सर्वसमावेशक बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करून नेतृत्व करत आहेत. चांगली सेवा, आर्थिक साक्षरता यावर त्यांचे विशेष लक्ष असते, याद्वारे समाजमनाशी त्यांचे संबंध दृढ झाले आहेत.

कामकाजात सुलभता, गतिमानता व अचूकता आणण्यासाठी ठेव, कर्ज, गुंतवणूक या सर्वच बाबींवर बारकाईने लक्ष ठेऊन बँकेच्या प्रगतीचा आलेख वारंवार कसा चढता राहील याचाच ध्यास नेहमी गुरव साहेब घेत असतात. त्याचाच परिपाक म्हणून साहेबांना आजपर्यंत विविध पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे.

दि कराड अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या शतकोत्तर वाटचालीचा मागोवा घेतला असता बँकेने नेत्रदीपक प्रगती साध्य केली आहे. बँकेच्या व्यवसायात वाढ झाली आहे. सन २००७ मध्ये सांगलीस्थित श्री पार्श्वनार्थ सहकारी बँकेचे विलीनीकरण करून आदर्श विलीनीकरणाचे उदाहरण सहकार क्षेत्रात बँकेने घालून दिले आहे. अजिंक्यतारा सहकारी बँक लि., सातारा व अजिंक्यतारा महिला सहकारी बँक लि., सातारा या दोनही बँका २०१७ रोजी विलीनीकरण करून घेतल्या. केवळ आकडेवारीचे नव्हे तर ग्राहक, सभासद, सेवक अशा सर्वांना अर्बन परिवारात बँकेने सामावून घेतले आहे. या विलीनीकरण प्रक्रियेत सीए दिलीप गुरव यांचा सिंहाचा वाटा आहे. याद्वारे सीए दिलीप गुरव यांनी सहकार चळवळ जीवंत ठेवण्यासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. बँकिंग क्षेत्रातील आव्हाने वेळीच ओळखून बँकेने ग्राहक सेवेला नवीन गती दिल्याने व्यवसायवृद्धीमध्ये सातत्य ठेवता आले आहे. कर्जदार लहान असो वा मोठा त्याला कर्जपुरवठा करत असताना त्याच्या व्यवसायाविषयी सल्ले देऊन योग्य त्या वापरासाठी कर्ज पुरवठा करणे यासाठी सीए दिलीप गुरव हे आग्रही असतात. सीए दिलीप गुरव यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यकाळातच बँकेमध्ये संगणकीय प्रणाली चालू झाली. त्यानंतर बँक कोअर बँकिंग सिस्टीम, एटीएम सेंटर, NEFT, RTGS, डीजीटल बँकिंग, मोबाईल बँकिंग, युपीआय सेवा अशा सर्व सेवा देण्यात बँक अग्रेसर राहिली.

बँकेच्या कामगिरीबद्दल बँकेला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँकस् असोसिएशनतर्फे दिला जाणारा प‌द्मभूषण वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्काराने सलग दोन वर्षे (२००७ व २००८) गौरविण्यात आले. तसेच कोल्हापूर जिल्हा ना. सहकारी बँकस् असोसिएशनतर्फे ‘सर्वोत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ हा पुरस्कार देण्यात आला. बँकिंग फ्रंटियरतर्फे उत्तम कोअर बँकिंग प्रणालीसाठी सन २०१४-१५ मध्ये गौरविण्यात आले. सन २०१५-२०१६ मध्ये अविज पब्लीकेशनतर्फे दिला जाणारा ‘बेस्ट बँक’ हा पुरस्कार बँकेस मिळाला.

२०१६ ला IDBRT हैद्राबाद यांच्या वतीने सहकारी बँकांना दिला जाणारा बेस्ट आयटी एनेबल्ड हा पुरस्कार तत्कालीन रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर रघुराम राजन यांच्या हस्ते बँकेस प्रदान करण्यात आला. हे सर्व सीए दिलीप गुरव यांच्या दूरदृष्टीतूनच साकार झाले आहे.

सीए दिलीप गुरव यांनी २००४-२००५ मध्ये दि कराड अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचा मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्विकरला तेव्हा बँकेचा मिश्र व्यवसाय ६६० कोटींचा होता. सभासद संख्या २५०१४ इतकी होती. २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाअखेर बँकेचा मिश्र व्यवसाय ५८३७ कोटींचा आणि सभासद संख्या ९००२० इतकी झाली आहे. सीए दिलीप गुरव यांच्या अथक परिश्रम, दूरदृष्टी, बँकेविषयी तळमळ असल्याचे द्योतक म्हणता येईल.

सीए दिलीप गुरव यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल कराड अर्बन बँकेचे ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी, बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी व व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी सीए धनंजय शिंगटे व सर्व संचालक बँकेचे ग्राहक, सभासद व सेवक वर्ग यांचेकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.सीए दिलीप गुरव यांना सन २००८ मध्ये कोल्हापूर जिल्हा ना. बँक्स असो. लि. कोल्हापूर यांचेतर्फे सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पुरस्काराने सन्मानित.माहे जून २०१७ मध्ये समर्थ फाऊंडेशन, कोल्हापूर यांच्यातर्फे बँकिंग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल विशेष सन्मानपत्राने गौरव.

जून २०१७ रोजी आविष्कार फाऊंडेशन, कोल्हापूर यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट बँक व्यवस्थापक या पुरस्काराने सन्मानित.

फेब्रुवारी २०२० मध्ये दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन लि. मुंबई यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी या पुरस्काराने सन्मानित.

ऑक्टोबर २०२३ मध्ये आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान, मुंबई यांच्या वतीने दिला जाणारा बँकिंग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सातारारत्न भूषण यापुरस्काराने सन्मानित.

मे २०२५ अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या वतीने सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल सहकार रत्न पुरस्कार.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान जनजागृती रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Post Views: 88 महाबळेश्वर नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान जनजागृती रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद महाबळेश्वर:महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर, निवडणूक

Live Cricket