‘बायोडायव्हर्सिटी मीट’ आंबोलीत — निसर्ग संवर्धनासाठी देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग
सावंतवाडी (प्रतिनिधी): पश्चिम घाटातील जैवविविधतेच्या संवर्धनासाठी आणि जनजागृतीसाठी येत्या २१, २२ आणि २३ नोव्हेंबर रोजी आंबोली (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) येथे ‘बायोडायव्हर्सिटी मीट २०२५’ म्हणजेच ‘जैवविविधता मेळावा’ भव्यदिव्य पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे.
गेल्या २० वर्षांपासून निसर्ग संवर्धनाचे कार्य करणाऱ्या ‘मलाबार नेचर कॉन्झर्वेशन क्लब, आंबोली’ आणि वनविभागाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या मेळाव्यात देशभरातील नामवंत निसर्गतज्ज्ञ, संशोधक आणि निसर्गप्रेमी सहभागी होणार आहेत. विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार असून निसर्गप्रेमींसाठी हा मेळावा एक अद्वितीय पर्व ठरणार आहे.
🎙️ तज्ज्ञांचे मार्गदर्शन विषयवार असे
सरपटणारे प्राणी आणि त्यांचे विश्व – केदार भिडे
उभयचर प्राणी – के. व्ही. गुरुराज (बेंगलोर)
वन्यजीव व वन अपराध – रोहन भाटे
पक्षी आणि त्यांचे जीवन – पराग रांगणेकर (गोवा)
फंगी (बुरशी) – शीतल देसाई
वन्यप्राणी संवर्धन – गिरीश पंजाबी
वनसंवर्धन व प्रश्न – भाई केरकर (गोवा)
फुलपाखरू व पतंग जगत – हेमंत ओगले व मिलिंद भाकरे
वनस्पती तज्ज्ञ – मिलिंद पाटील
वटवाघूळ तज्ज्ञ – राहुल प्रभू खानोलकर
निसर्गातील घडामोडींचे सोशल मीडियावर सादरीकरण – रमण कुलकर्णी
🌲 उपक्रमाचे वैशिष्ट्ये
या तीन दिवसांच्या कार्यक्रमात तज्ञांची व्याख्याने, जंगल भ्रमंती, अभ्यास उपक्रम तसेच रात्रीच्या वेळी स्थानिक लोककला – दशावतार नाटक सादर केले जाणार आहे. स्थानिक नागरिकांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून, सहभागींना निसर्गाशी जवळीक साधण्याची उत्तम संधी मिळणार आहे.
🙌 ‘ना नफा, ना तोटा’ तत्वावर उपक्रम
हा उपक्रम ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर राबविण्यात येत असून, अधिकाधिक निसर्गप्रेमींनी सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
नोंदणीसाठी संपर्क –
📞 काका भिसे (आंबोली): 7588447161
📞 राजेश देऊळकर: 9765575690
📧 ईमेल: mnccamboli2016@gmail.com




