बिभवी दुर्घटनाग्रस्त पाच कुटुंबांना ₹५ लाखांचे सहाय्य; एकनाथ ओंबळे यांच्या पाठपुराव्याला यश
केळघर, ता:३०: बिभवी येथे काही महिन्या पूर्वी एका घरात सिलेंडरचा स्पोट होऊन ५ घरे जळली होती. त्या कुटुंबास आर्थिक मदत मिळवून देण्या करिता सातारा जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन तत्काळ त्या ५ कुटुंबास आर्थिक सहाय्य देण्याची मागणी केली होती. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कुटुंबास ५ लाख रुपये मदत करण्याचे स्पष्टपणे सांगितले होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने जिल्हा सह संपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे यांनी बाधित कुटुंबियांची भेट घेऊन पाच लाख रुपयांची मदत देण्यात आली.यावेळी सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित भोसले,जिल्हापरिषद सदस्य कविता ओंबळे, जिल्हा परिषद सदस्य अजित संकपाळ,युवासेना जिल्हा समन्वयक राजू केंजळे,युवासेना जिल्हा प्रमुख विशाल संकपाळ,महाबळेश्वर तालुका प्रमुख गणेश उतेकर,शिवसेना नेते सचिन जवळ,समाजसेवक सचिन कदम,उप तालुका प्रमुख राम संकपाळ,केळघर शहर प्रमुख बाळासाहेब शिर्के,वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख प्रशांत जुनघरे ,युवानेते तुषार पार्टे, गावचे सरपंच संतोष बांदल,नामदेव बांदल,वसंत पवार,शिवाजी जाधव, व ग्रामस्थ,शिवसैनिक उपस्थित होते.




