Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » भीम शाही युवाक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

भीम शाही युवाक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

भीम शाही युवाक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

केळघर प्रतिनिधी: जावळीच्या मुख्यालय मेढा पासून जवळच परंतु वंचित असलेल्या मरडमुरे, कुंभार्गणी, धनगरवस्ती, अश्या अनेक गावातील ज्या शाळेत जाण्यासाठी गाडी तर सोडाच पण पायी प्रवास करण्यासाठी डोगरातून पाऊल वाट देखील नाही अशा ठिकाणी भीमशाही युवाक्रांती संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले तसेच एका अनोख्या पद्धतीने ऑक्सिजन चे महत्व पटवून देत शेकडो झाडांची रोपे वाटप करण्यात आली या उपक्रमासाठी संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी खूप मेहनत घेतली असून कार्यक्रमास उपस्थिती दाखवून कार्यक्रम उत्कृष्ट रित्या पार पाडला.

संघटना अशाच प्रकारचे समाज उपयोगी काम करत राहील अशी संघटना मार्फत जमलेल्या ग्रामस्थांना ग्वाही दिली या वेळी अनेक नागरिकांनी तेथील व्यथा मांडल्या परंतु त्यांनी दाखवलेली आपुलकीने संघटनेच्या पदाधिकारी भावनिक देखील झाले तालुक्याच्या ठिकाणापासून जवळ असून ही गावे सोयी सुविधा पासून वंचीत राहिली असून शासनाने याकडे लक्ष द्यावे असा सूर येथील नागरिकांच्या कडून आहे असे निदर्शनास आले.

संघटनेच्या माध्यमातून या वंचित गावांना जमेल ती मदत करण्याची ग्वाही देऊन उपस्थित लोकांचे आभार मानून कार्यक्रम पार पाडला संघटनेने असे अनेक कार्यक्रम हाती घेतले असून ते पूर्ण करू असे या वेळी सांगण्यात आले. कार्यक्रमासाठी भीमशाही युवाक्रांती संघटने चे आमन चव्हाण,प्रकाश गाडे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष संग्राम भैया रोकडे,सूर्यकांत जाधव, मंगेश पवार,अविराज परिहार ,वेदांत सोनवणे,राजेश माने,अजित गाडे,राज गाडे,प्रथमेश,आर्यन, रोशन कांबळे, करण कांबळे तसेच संघटनेचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते २७ एप्रिल दरम्यान चालेल

Post Views: 79 नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते

Live Cricket