Post Views: 188
भगवे वस्त्र, हातात रुद्राक्षाची माळ आणि मंत्रोच्चार!! पंतप्रधान मोदींचे गंगेत पवित्र स्नान
प्रतिनिधी -प्रयागराज येते सुरू असलेल्या महाकुंभ मेळाव्याला संपूर्ण जगभरातील मोठंमोठ्या लोकांनी हजेरी लावली आहे. आज या महाकुंभ मेळ्यात हजेरी लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही माघ अष्टमीच्या शुभदिनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले. भगवे वस्त्र परिधान करून, गळ्यात व हातात रुद्राक्षाची माळ घालून मोदींनी या धार्मिक विधीमध्ये सहभाग घेतला. स्नानपूर्वी त्यांनी गंगा नदीची विधीवत पूजा केली आणि मंत्रोच्चाराच्या करत गंगेत स्नान केले.
