महाबळेश्वरमध्ये बाळासाहेब ठाकरे जयंती;नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती उत्साहात साजरी
महाबळेश्वर दि: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज महाबळेश्वरमध्ये शिवसेनेने विविध कार्यक्रम आयोजित केले. शिवसेना मा. जिल्हाप्रमुख श्री. राजेश (बंडू शेठ) कुंभारदरे आणि मा. श्री. यशवंत घाडगे यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना श्री. कुंभारदरे आणि श्री. घाडगे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याची प्रशंसा करत ठाकरे कुटुंबासोबत एकनिष्ठ राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे नियोजन शहरप्रमुख श्री. राजाभाऊ गुजर यांनी केले.
महाबळेश्वर नगरपालिकेच्या वतीने श्री. आबा साहेब ढोबळे आणि कर्मचारी वर्गानेही बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच सर्व शिवसैनिकांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि मा. मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या कार्यक्रमात महिला आघाडी जिल्हाप्रमुख राजश्री भिसे, तालुकाप्रमुख श्री. अभिषेक शिंदे, आरोग्य सेना तालुका समन्वयक श्री. शंकर ढेबे, मा. नगरसेवक, शहरप्रमुख श्री सुनील नाना साळुंखे, युवसेना शहरधिकारी श्री. आकाश साळुंखे, मा. नगरसेवक ज्येष्ठ शिवसैनिक श्री. रमेश शिंदे, पत्रकार श्री. बापू काळे, श्री.राजेश सोंडकर, महिला आघाडी तालुकाप्रमुख सौ. सुजाता मोरे, महिला आघाडी उपशहरप्रमुख सौ. वसुधा बगाडे, सौ. पौर्णिमा मोहिते, श्री. एकनाथ मोरे, श्री. तात्या साळुंखे, आरोग्य सेना शहर समन्वयक श्री. अमोल साळुंखे, श्री. प्रशांत मोरे, बाळासाहेब ढेबे, अशोक ढेबे, अतुल पारवे, दीपक ताथवडेकर, वैभव शिंदे तापोळा, कामगार सेना युनिट प्रमुख अमर सरतापे, गणेश शिंगरे, प्रकाश ढेबे, संजय ढेबे, दत्तात्रय जाधव बोपेगाव, नयन वन्ने, शाहनवाझ खारकंडे, समीर तांबोळी, जावेद शेख, शशीकांत जाधव रामचंद्र आखाडे, रामदास आखाडे, कुरेशी, अभिजित कानडे, जितेश कुंभारदरे, यशवंत भिलारे, अंकुश उलालकर, सातारा जिल्हा प्रसिद्धी जिल्हाप्रमुख चंद्रकांत पांचाळ आदी शिवसैनिक आणि नागरिक उपस्थित होते.
