अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » कर्जमाफीसाठी सातबारा कोरा करा यासाठी बच्चू कडू आक्रमक

कर्जमाफीसाठी  सातबारा कोरा करा यासाठी बच्चू कडू आक्रमक 

कर्जमाफीसाठी  सातबारा कोरा करा यासाठी बच्चू कडू आक्रमक 

नागपूर :कर्जमाफी, सातबारा कोरा करा, या व अन्य अशा प्रमुख मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या माजी मंत्री बच्चू कडू यांच्या महा एल्गार आंदोलनाची धास्ती राज्यसरकारने घेतली आहे. आंदोलक सिव्हिल लाईन्स मध्ये शिरण्याची शक्यता पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान रामगिरी समोर संचारबंदी सदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली. रोज सायंकाळ गजबजणारा वाॅकर्स स्ट्रीट वाहतूकीस पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. कामगिरीकडे येणाऱ्या सर्व मार्गांवर पोलिसांनी बॅरिकेट्स लावून वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्तामुळे संपूर्ण रामगिरीला छावणीचे स्वरूप आले आहे.

सोबतच आंदोलक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या महाल आणि रेशिमबागकडेही जाऊ शकतात अशी गुप्त सूचना मिळताच पोलिसांनी या दोन्ही ठिकाणी देखील कडेकोट बंदोबस्त वाढवला आहे. या घडामोडीत वर्ध, चंद्रपूर आणि हैदराबादकडून येणारी आणि जाणारी सर्व वाहतूक व्यवस्था ठप्प पडली आहे. बुटीबोरी ते जामठा रस्ता संपूर्णपणे आंदोलनामुळे जाम झाला आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी संपूर्ण वर्धा मार्गांवर ठाण मांडल्याने मिहान पुलाखाली चक्का जाम झाला आहे.

शेतकरी नेते राजू शेट्टी, विजय जावंधियी, माजी मंत्री महादेवराव जानकर, रविकांत तुपकर आंदोलनस्थळी कापूस संशोधन केंद्राशेजारील मैदानात दाखल झाले आहेत. प्रहारचे प्रणेते माजी राज्यमंत्री बच्चू कडू हे स्वतः ट्रॅक्टर चालवत आंदोलनात सहभागी होत आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket