आठवडा बाजार ही संकल्प मुलांच्या व्यवहारी ज्ञान वाढीसाठी उपयुक्त-मोहनराव जाधव( सभापती)
लोहारे शाळेत भरला भोगीचा बाजार
वाई प्रतिनिधी (शुभम कोदे )वाई तालुक्यातील प्राथमिक शाळांचा विचार केल्यास कवठे या शाळेस भारताचे भारताचे पहिले पंतप्रधान मा. पंडीत नेहरू यांनी भेट दिली होती. तर लोहारे शाळेच्या पायाभरणी वेळी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री . यशवंतराव चव्हाण यांनी भेट दिली होती याचे एकमेव कारण म्हणजे या गावातील थोर विचारवंत व वाई पंचायत समितीचे माजी सभापती . सर्जेराव जाधव यांची व यशवंतराव चव्हाण यांचे सोबत असलेली मैत्री.. म्हणूनच आज लोक सहभागातील गुणवत्तेचे तोरण शाळा लोहारे नावारूपाला येत आहे.
भोगीच्या आदल्या दिवशी या शाळेत गेले पाच ते सहा वर्षे आठवडा बाजार भरविण्यात येतो. याचेच औचित्य साधून यावर्षीचा आठवडा बाजार शनिवार दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी शाळेच्या मैदानात भरविण्यात आला.या बाजारास भेट देण्यासाठी बाजार समितीचे सभापती .मोहनराव जाधव तर लोहारे ग्रामपंचायतीचे सरपंच डॉ. मदन जाधव यांनी भेट दिली..
पहाटेचे थंडीचे वातावरण असूनही अनेक पालक व शिक्षण प्रेमी ग्रामस्थांनी यावेळी भेट देऊन खरेदीचा आनंद लुटला.. यामध्ये महिलांची संख्या उल्लेखनीय होती..पावटा घ्या पावटा , भोगीच्या पावटा स्वस्त पावटा तर घ्या शेंगा रसदार शेंगा इत्यादी आरोळींनी शालेय परिसर दुमदुमून गेला..
विद्यार्थ्यांना खरेदी-विक्री , नाणी नोटा , नफा तोटा या जीवन व्यवहारातील संकल्पना स्पष्ट होण्या बरोबरच जीवन व्यवहार संवाद सहयोग , आत्मविश्वास व सुजनशीलता आदी गुणांची शिकवण व दैनंदिन जीवनातील आर्थिक व्यवहाराची माहिती व्हावी यासाठी हा उपक्रम राबविला जातो .
भोगीच्या सणाचे औचित्य साधून भरवण्यात आलेल्या बाजारामुळे अनेक महिलांची पावटा, गाजर , तीळ , बाजरी वांगी , हरबरा व पेरू भुईमूग शेंगा , बोरे इ. गोष्टी खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली. तर पाणीपुरी , वडापाव , सामोरा व भेळीच्या स्टॉल पुढे खवयांची गर्दी दिसून येत होती .
यावेळी बोपर्डी केंद्राचे केंद्रप्रमुख देवकुमार यादव शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष .राम सुतार सौ प्राजक्ता भोईटे , उपाध्यक्षा, सौ मनीषा गुरव. गणेश भोसले मनिषा बाबर अनिल सचिन भोईटे.सौ.प्रेमा भिलारे,सौ अश्विनी भोसले,सौ गुरव श्री सावंत ,. . नवनाथ शिंदे, शिक्षणप्रेमी,. रफिक डांगे , राजेंद्र शेलार
महिलावर्ग,युवक युवती ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, तर आठवडा बाजार यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक शेखर जाधव , शरद पोतदार, धनाजी जेधे , बाळकृष्ण जाधव या शिक्षकांनी प्रयत्न केले…
आठवडा बाजार ही संकल्प मुलांच्या व्यवहारी ज्ञान वाढीसाठी उपयुक्त आहे. खरेतर असे उपक्रम महिन्यातून एकदा तरी भरवण्यात यावेत.. ग्रामस्थ व मुलांचा प्रतिसाद पाहून खरोखरच मी अचंबित झालो.
मोहनराव जाधव सभापती
कृषी उत्पन्न बाजार समिती, वाई
