अंजुमन इस्लाम पब्लिक स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज पाचगणीचा १०५ वा वर्धापनदिन दिनांक १५ फेब्रुवारी रोजी होणार साजरा
पाचगणी प्रतिनिधी -अंजुमन इस्लाम या संस्थेची स्थापना सन १८७४ मध्ये स्वातंत्र्य सैनिक बटुद्दीन तय्यबजी यांनी १३० मुले व तीन शिक्षक घेऊन केली. आता या संस्थेचे रोपट वटवृक्षाप्रमाणे बहरले आहे. या संस्थेच्या 97 शाखा विस्तारल्या असून यात लाखो विद्यार्थी केजी पासून डॉक्टररेट पदवीपर्यंत शिक्षण घेत आहेत. यावर्षी संस्थेने यशस्वीपणे १५० वर्षे पूर्ण केली आहेत. या संस्थेला NGO मार्फत OFA (Overseas Friends of Anjuman) हा अमेरिका तसेच MIT, Boston, USA आणि Westminster University, United Kingdom यांच्याशी सहयोगी आहे.
अंजुमन इस्लाम स्कूल पाचगणी या ठिकाणी १०४ वर्षापूर्वी म्हणजेच १९२० साली इंग्रजी माध्यम निवासी शाळेची स्थापना करण्यात आली. मुलांना निसर्गरम्य ठिकाणी विविधता पूर्ण शिक्षण देण्यासाठी या शाळेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. या शाळेने १०४ वर्षात देदीप्यमान व यशस्वी कामगिरी करत लाखो विद्यार्थ्यांनी शिक्षण या शाळेत पूर्ण केलं आहे. या शाळेचा वर्धापन दिन आपण १५ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित केला आहे.
या कार्यक्रमात शाळेच्या विद्यार्थ्यांनी शालेय, कला व क्रीडा विभागात चमकदार कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे तसेच विज्ञान प्रदर्शन, हस्तकला – चित्रकला प्रदर्शन व पाककला प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वाई-खंडाळा महाबळेश्वर तालुक्याचे आमदार व महाराष्ट्र राज्य मदत व पुनर्वसन मंत्री माननीय श्री मकरंद आबा पाटील असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री पुरस्कार डॉ. झहीर काझी (अध्यक्ष अंजुमन इस्लाम शैक्षणिक समूह) असणार आहेत.
तसेच संस्थेचे उपाध्यक्ष मुश्ताक अंतुले, चेअरमन (मौलाना आझाद अल्पसंख्याक विकास प्राधिकरण) संस्थेचे विश्वस्त डॉ. शेख अब्दुल्ला, मोईज मियाजीवाला, शकील शेख, ऍड.अखिल हाफिज, शोएब जामखानवाला, शोहाब रईस तसेच संस्थेचे चेअरमन आडवोकेट शौकत अली बेटगरी व शाळेच्या मुख्याध्यापिका अफरोज खान इत्यादी मान्यवर उपस्थित असणार आहेत.
