अलकनंदा नदीत बस कोसळून भीषण अपघात ११ प्रवासी बेपत्ता
१८ प्रवाशांना घेऊन जाणारी बस ब्रदीनाथला चालली होती. त्यावेळी चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं. ही बस नदीत कोसळली. स्थानिकांना ही बाब कळल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना कळवली. पोलीस आणि एसडीआरएफचं पथक या ठिकाणी आलं.
उत्तराखंडमधील रुद्रप्रयागमध्ये एक बस अलकनंदा नदीत कोसळून अपघात झाला आहे. या बसमध्ये १८ प्रवासी बसले होते. त्यापैकी सात जणांना वाचवण्यात आलं आहे तर ११ प्रवासी बेपत्ता झाले आहेत. या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य तातडीने सुरु करण्यात आलं आहे. स्थानिक पोलीस, एसडीआरएफचं पथक यांच्याकडून बचावकार्य सुरु आहे. ११ बेपत्ता प्रवाशांना शोधण्यात येतं आहे.
नेमकं काय झालं याचा तपासही केला जातो आहे. गेल्या काही दिवसांपासून रुद्रप्रयाग, केदारनाथ या ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे अलकनंदा नदीचा प्रवाहही वेगाने वाहतो आहे. बस याच नदीत कोसळली आहे. त्यामुळे हे प्रवासी या प्रवाहासह वाहून गेले आहेत. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचीही माहिती ANI ने दिली आहे.
