अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » मृत्यूनंतर ही अजित दादांची होतंय अवहेलना…

मृत्यूनंतर ही अजित दादांची होतंय अवहेलना…

मृत्यूनंतर ही अजित दादांची होतंय अवहेलना…

सातारा-राज्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा व राजकीय क्षेत्रात ज्यांचा शब्द प्रमाण मानला जायचा ते राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाने राज्याचे अतोनात नुकसान झाले आहे. एक राजकीय जबाबदार व तितकेच कर्तुत्वान असणारे हे नेतृत्व विमान अपघातात मृत्युमुखी पडले.

अपघात की घातपात याबाबत जनतेच्या मनामध्ये असंख्य संभ्रम निर्माण झाले आहेत.अपघाताविषयी येणारी माहिती व वास्तव घटनाक्रम यामध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती आढळत असल्याने संशयाला अधिक वाव मिळत आहे.अपघाताची घटना घडल्यानंतर विविध चॅनल व माध्यमाने उपस्थित केलेल्या प्रश्नांकडे खरे तर गांभीर्याने संबंधित यंत्रणेने लक्ष देणे गरजेचे होते.

अजितदादा पवार यांचे व्यक्तिमत्व हे एक वादळी होते.राजकीय जीवन प्रवासात अनेक चढ-उतार पाहिलेले या नेतृत्वाने राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी झटताना वेळप्रसंगी काही वेळा नियमांना बगल देत जनतेचे प्रश्न मार्गी लावले, असे हे खंबीर नेतृत्व बऱ्याचदा राजकीय विरोधकांच्या आरोपाला सामोरे जावे लागले होते.जनतेचे प्रश्न प्राधान्य क्रमाने सोडवणे यासाठी त्यांनी अनेकांना अंगावर घेतले होते. विरोधकांनी या नेतृत्वाला अडचणी करण्यासाठी अनेकदा खोटे व बनावट भ्रष्टाचाराचे आरोप करून अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.

परंतु दादांनी यावर मात करत विरोधकांचे मनसुबे उधळून लावले होते.दादांच्या राजकीय जीवन प्रवासात भ्रष्टाचार हा मुद्दा विरोधकांनी आयुष्यभर लावून धरला होता.बेछुटपणे आरोप करून अजितदादांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा विरोधकांनी अतोनात प्रयत्न केले त्यांच्या हयातीत त्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आणण्याचा जणू काय विडाच विरोधकांनी हाती घेतला होता.

यामध्ये प्रामुख्याने जलसंपदा विभागातील ७० हजार कोटी रुपयांचा व शिखर बँक घोटाळा हे भ्रष्टाचाराचे आरोप लावले जात होते.अजितदादांची राजकीय कारकीर्द या माध्यमातून संपुष्टात आणायची हा चंगच जणू काय या विरोधकांनी अवलंबला होता.परंतु मुरब्बी अजितदादांनी डावपेच मोठ्या कुशलतेने उधळून लावले.अजितदादा आणि भ्रष्टाचाराचे आरोप हे एक महाराष्ट्राचे जणू काय समीकरणच या विरोधकांनी निर्माण केले होते.राजकारणातील शह, प्रतिशहाच्या डावपेचात माहेर असलेले अजितदादा विरोधकांच्या हाती मात्र काही लागले नाही.वास्तविक दादांच्या राजकीय जीवन प्रवासामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना अजितदादा यांनी आपले लक्ष मात्र महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकास व प्रगती ध्येय ठेवून करीत होते.

अजितदादांच्या हयातीत भ्रष्टाचाराचे आरोप करण्यामध्येच विरोधकांनी धन्यता मानली हे तितकेच खरे. अजितदादांचे राजकीय वजन जसजसे वाढू लागले तसतसे हितशत्रू व विरोधक ही मोठ्या प्रमाणात वाढू लागले.राज्याचा कारभार हाकताना कळत नकळत प्रशासनातील राहिलेल्या त्रुटीचे खापर मात्र अजितदादांच्या नावावर पडत असे. यामधून निर्माण होणारे संशयाचे भूत मात्र दादांच्या मानगुटीवर वर बसत असे.एकीकडे भ्रष्टाचाराचे आरोप तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन असणारे हे नेतृत्व विकासासाठी व प्रगतीसाठी अनेकदा त्यांनी राजकीय भूमिकेत बदल केला.सत्तेशिवाय प्रगती साधता येणार नाही ही भूमिका घेऊन अजितदादांनी भारतीय जनता पक्षाशी जुळवून घेतले.हे जरी खरे असले तरी अजितदादांनी आपले विकासाचे ध्येय पूर्ण करणे हे अंतिम उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यांची वाटचाल सुरू होती.परंतु दुर्देवी घटनेमध्ये त्यांचा झालेला अपघात कि घातपात याबाबत आता उलट सुलट राजकीय पटलावर चर्चा उमटून येत आहेत.दादा नावाचे एक वादळ महाराष्ट्रातून लुप्त झाले.हे आजही येथील जनतेला विश्वास बसत नाही.दादांच्या हयातीत व दादांच्या मृत्यूनंतरही दादांची अवहेलना होत आहे.राज्यातील कर्तुत्वान नेतृत्वाच्या झालेल्या अपघातविषयी सर्वच नेतेमंडळी मुग गिळून आज बसल्याचे विदारक चित्र समोर येत आहे.

दादांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी मंडळी या विषयाकडे दुर्लक्ष करीत आहेत.दादांचा घात की अपघात याविषयी न बोलणारे राजकीय पुढाऱ्यांशी लोकांच्या मनामध्ये आता वेगवेगळ्या शंका येऊ लागल्या आहेत.प्रथमदर्शनी अपघात वाटत असला तरी यामध्ये काहीतरी काळे बेरे असल्याचे आता विविध चॅनलच्या माध्यमातून होत असलेल्या खुलाश्यांतुन दिसत आहे.अजितदादाचा मृत्यू हा नैसर्गिक का अनैसर्गिक याबाबत सखोल चौकशीची मागणी आता जोर धरू लागली आहे.

यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी याबाबत पुढाकार घेतला असून या प्रकरणाचा छडा लावण्याचा ते प्रयत्न करीत आहेत.सातत्याने विविध विभागाकडे ते तक्रार दाखल करीत आहेत. परंतु अजितदादा सारख्या नेत्याची दुर्दैवी घटना घडली या घटनेकडे संबंधित विभाग कानाडोळा करीत आहेत.दादांच्या मृत्यूचा पोलखोल करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी मात्र युद्ध पुकारले असून त्यांच्या या पाठपुऱ्याला काही प्रमाणात यश ही लागत आहे.अजितदादांच्या मृत्यूनंतरही त्यांची होत असलेली अवहेलना काही केल्या संपत नाही, ही दुर्दैवी बाब आहे. घातपाताविषयी शंका उपस्थित करणारे आमदार रोहित पवार हे विविध राजकीय नेत्यांना भेटून आपली भूमिका पटवून देत आहेत.विमान कंपनीच्या संशयास्पद कारवाईचा ते पर्दाफाश करीत आहेत.एकीकडे विमान कंपनी जबाबदारी स्वीकारत नाही, तर घडलेल्या घटनेबाबत पोलीस यंत्रणा एफ.आय. आर दाखल करून घेत नाहीत.अखेर मृत्यूनंतर ही दादांच्या वाटेला न्याय मिळत नसल्याने दादांच्या हयातीत व नंतरही त्यांच्या जीवनाची होत असलेली अवहेलना थांबणार की नाही असे आता जनतेमधून बोलले जात आहे…

 

हयातीत असताना आणि नसताना सुद्धा अजितदादा सारख्या एका कर्तृत्ववान नेतृत्वाला न्यायासाठी झगडावे लागत आहे.राजकारणी मंडळी राजकारण करण्यात मग्न आहेत.दादांच्या मृत्यूचे भांडवल करीत स्वतःचा स्वार्थ साधण्याचा काही मंडळी प्रयत्न करीत आहेत.गलिच्छ राजकारणाचा आता जनतेला ही विट येऊ लागला आहे. राजकारणात कोणच कुणाचा नसतो हे या घटनेवरून दिसून येते.दादांच्या हयातीत पुढे पाठीमागे पिंगा घालणारे आता मात्र मूग गिळून गप्प बसले आहेत.येथेच खऱ्या अर्थाने संशयाला जागा निर्माण होत आहे.अजितदादांनी हयातीत असताना ही संघर्ष करावा लागला आणि मृत्यूनंतरही त्यांच्या वाटेला संघर्ष यावा हे दुर्दैव आहे.

श्रीरंग काटेकर सातारा

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket