Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » अजिंक्यतारा साखर कारखान्याकडून “कूपर ट्रक्टरची” खरेदी

अजिंक्यतारा साखर कारखान्याकडून “कूपर ट्रक्टरची” खरेदी

अजिंक्यतारा साखर कारखान्याकडून “कूपर ट्रक्टरची” खरेदी

सातारा प्रतिनिधी -साता-यातील 100 वर्षा पेक्षा जास्त उद्योग क्षेत्रातील गौरवशाली परंपरा असलेला कूपर कार्पोरेशन  नुकतेच ट्रॅक्टर उत्पादनात पदार्पण केले. कूपरचा ट्रॅक्टर म्हणजे भारतातील पारशी उद्योजकाने उत्पादन केलेला पहिला ट्रॅक्टर आहे. कूपरचा NDC 5000 व NDC 5001 या दोन्ही ट्रॅक्टरची शेतक-यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.

साता-यातील नामांकित अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना यांनी नुकतीच कूपरच्या दोन ट्रक्टरची खरेदी केली. या ट्रॅक्टरचा हस्तांतरण सोहळा मा. ना. छ. शिवेंद्रराजे भोसले महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम मंत्री, मा. श्री. यशवंत साळुंखे, अध्यक्ष अजिंक्यतारा सह. साखर कारखाना, मा. श्री जिवाजी मोहिते, कार्यकारी संचालक अजिंक्यतारा सह साखर कारखाना व सर्व संचालक मंडळ व मान्यवरांच्या उपस्थितीत अजिंक्यतारा सह. साखर कारखान्याच्या परिसरात पार पडला.

कूपरच्या दोन्ही ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये म्हणजे युकेच्या नामांकीत रिकार्डो कंपनीने डिझाइन केलेले कूपरचे हेवी ड्युटी इंजिन, मॅग्ना स्टेअरचे आकर्षक डिझाइन, सुलभ रिलीज कपलर, अर्गोनॉमिक डिझाइन, शटल शिफ्ट सहित सिंक्रो-मेश करारो गियर बॉक्स, उच्च दर्जाचे हायड्रॉलिक्स व इंधनाची बचत करून अधिक मायलेज देणारी टेक्नॉलॉजी हे शेतक-यांसाठी विशेष पसंती ठरत आहे.

कारखान्याची 48 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, दि. 29.09 2025 रोजी कारखान्याच्या परिसरात पार पडली. या प्रसंगी हस्तांतरण झालेले कूपरचे दोन्ही ट्रॅक्टर प्रदर्शनासाठी ठेवलेले होते. सभेसाठी आलेल्या सभासद शेतकरी बांधवानी मोठ्या संख्येने प्रदर्शन स्थळी भेट दिली.

या प्रसंगी अजिंक्यतारा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मा श्री नामदेवराव सावंत व सर्व मा संचालक मंडळाचे पदाधिकारी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मा. श्री. सुरेश सावंत, मा.सौ. कांचनताई साळुंखे, सातारा बाजार समितीचे अध्यक्ष मा.अॅड विक्रम पवार व इतर मान्यवर तसेच कूपर उद्योग समूहातर्फे श्री.अस्लम फरास डायरेक्टर, श्री गंगाधर तांबे, श्री संजय सलटे, श्री रणजित शिंगारे, श्री. प्रकाश कदम व श्री. रणजित सावंत हे उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते यांचा अर्ज छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांच्या उपस्थितीत दाखल

Post Views: 475 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते यांचा अर्ज छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांच्या उपस्थितीत दाखल सातारा (अली मुजावर )साताऱ्यात आज

Live Cricket