अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » बारावीनंतर करिअरचा महासागर; फक्त पदवीला शून्य किंमत, स्पेशलायझेशनला महत्त्व – संतोष कार्ले

बारावीनंतर करिअरचा महासागर; फक्त पदवीला शून्य किंमत, स्पेशलायझेशनला महत्त्व – संतोष कार्ले

बारावीनंतर करिअरचा महासागर; फक्त पदवीला शून्य किंमत, स्पेशलायझेशनला महत्त्व – संतोष कार्ले

‘वायसी’मध्ये करिअर मार्गदर्शन कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद

सातारा (शिवाप्पा पाटील ): येथील रयत शिक्षण संस्था संचालित यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या नामांकित महाविद्यालयामध्ये ‘स्टुडंट ॲक्टिव्हिटी’ अंतर्गत प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘बारावीनंतरच्या करिअर वाटा’ या विषयावर सोमवार (ता. १३) रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष मार्गदर्शन कार्यशाळेला विद्यार्थी आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्युनिअर विभागाच्या उपप्राचार्य नंदिनी साळुंखे होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध करिअर कौन्सिलर संतोष कार्ले उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. व्ही. आर. पवार यांनी केले. यावेळी पर्यवेक्षक एन. टी. निकम, सहायक पर्यवेक्षक प्रा. निर्मल पाटील तसेच प्रा. रवींद्र खोत यांची प्रमुख उपस्थिती होती.

    मार्गदर्शन करताना श्री. कार्ले म्हणाले, “बारावीनंतर विद्यार्थ्यांसमोर करिअरच्या संधींचा अक्षरशः महासागर उभा आहे. मात्र, त्या महासागरातून योग्य दिशा निवडण्याची क्षमता विद्यार्थ्यांनी विकसित केली पाहिजे. केवळ पदवी मिळविणे हा यशाचा निकष राहिलेला नाही. आजच्या जगात निव्वळ साध्या पदवीला, प्लेन डिग्रीला काहीच किंमत राहिलेली नाही, तिची किंमत आज शून्य आहे. आजच्या युगात ‘स्पेशलायझेश’चे महत्त्व अफाट वाढले असून विद्यार्थ्यांनी स्वतःला सतत अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात स्पेशलायझेशन, कौशल्यविकास आणि सातत्याने स्वतःला अद्ययावत ठेवणारे विद्यार्थीच यशस्वी होतात.”

    पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, विज्ञान शाखेत दोनशेहून अधिक, वाणिज्य शाखेत दीडशेहून अधिक आणि कला शाखेत साडेतीनशेहून अधिक करिअरचे पर्याय उपलब्ध आहेत. एमबीएच्या चव्वेचाळीस, कायद्याच्या एकेचाळीस, पत्रकारितेच्या अठरा, अभियांत्रिकीच्या शंभर तर डिप्लोमाच्या सत्त्याण्णव शाखांमधून विद्यार्थी उज्ज्वल भविष्य घडवू शकतात, असे त्यांनी नमूद केले.

अभियांत्रिकी, वैद्यकीय, पशुवैद्यकीय, कृषी, फार्मसी, कायदा, व्यवस्थापन, पर्यावरण, डेटा अनालिटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, विज्ञान, वाणिज्य, कला तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांतील करिअरच्या संधींचा त्यांनी सविस्तर ऊहापोह केला. भविष्यात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणाऱ्या क्षेत्रांची माहिती देत विद्यार्थ्यांनी पुढील दहा वर्षांचा विचार करून करिअरची दिशा निश्चित करावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

    यावेळी कार्यशाळेत जेईई मेन, जेईई ॲडव्हान्स्ड, नीट, सीएसआयआर, आयआयटी, एमएचटी-सीईटी, सीयुइटी-यूजी यांसारख्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांचे महत्त्व, त्यांची पात्रता, परीक्षेची तयारी, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यात आली. ऑनलाईन अर्ज भरताना घ्यावयाची काळजी, महाविद्यालयाची निवड करताना विचारात घ्यावयाच्या बाबी तसेच पालकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता वेळेत करून ठेवण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.

   नीट परीक्षेच्या स्पर्धेचे वास्तव मांडताना श्री. कार्ले म्हणाले, “दरवर्षी सुमारे २२ लाख विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षा देतात. मात्र, त्यापैकी केवळ ४२ हजार विद्यार्थ्यांनाच देशातील १०७ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळतो. त्यामुळे योग्य नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन हेच यशाचे गमक आहे, असेही ते म्हणाले. दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या आरक्षणाच्या तरतुदी, विविध शिष्यवृत्ती योजना तसेच भारत सरकारने २०२४ पासून सुरू केलेल्या नव्या अभ्यासक्रमांची माहितीही त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. दहा वर्षांनंतर भविष्यकाळात कोणत्या क्षेत्रांना सर्वाधिक मागणी असेल, हे ओळखून विद्यार्थ्यांनी करिअर निवडले पाहिजे, असा सल्ला देत श्री. कार्ले यांनी देश-विदेशातील नामांकित विद्यापीठांची ओळख करून दिली. तसेच उच्च शिक्षणाच्या संधी आणि जागतिक रोजगाराच्या बदलत्या गरजांवरही त्यांनी प्रकाश टाकला.

    विद्यार्थ्यांच्या भविष्याचा भक्कम रोडमॅप देणाऱ्या या मार्गदर्शनपर कार्यक्रमासाठी कर्मवीर सभागृह विद्यार्थ्यांनी खचाखच भरल्याने उर्वरित विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाच्या विविध ठिकाणी स्क्रीनद्वारे थेट प्रक्षेपणाची, आभासी (वर्चुअल) व्याख्यानाची व्यवस्था करण्यात आली होती. व्याख्यानादरम्यान विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना श्री. कार्ले यांनी समर्पक उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, करिअर नियोजन आणि भविष्यातील संधींबाबत स्पष्ट दिशा मिळाली. या कार्यशाळेमुळे आम्हाला उच्च शिक्षणाबद्दल एक नवीन उत्साह आणि योग्य करिअर निवडण्यासाठी निश्चित दिशा मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.प्रा. एस. ए. जगताप यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. वैभव राऊत यांनी आभार मानले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket